शुभमन गिलची धडाकेबाज खेळी! दिग्गजांचा विक्रम मोडत नाबाद 223; अवघ्या 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?

गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने इतिहास रचला.
IND VS WI 2nd ODI
Shubman Gill IND VS WI 2nd ODI

भारतीय वनडे क्रिकेट संघाने सलग दुसरा सामना देखील आपल्या नावावर केला आहे. पहिला सामना विराट कोहली तर कालचा दुसरा सामना हा शुभमन गिलच्या दमदार खेळीने विजयी मिळवला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने इतिहास रचला. वेस्ट इंडिजने दिलेले 406 धावांचे विशाल लक्ष्य गाठताना गिलने अवघ्या 133 चेंडूंमध्ये 26 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 223 धावांची वादळी खेळी केली.

शुभमनच्या या खेळीच्या जोरावर भारताने 8 गडी राखून वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. या ऐतिहासिक विजयानंतर आणि 2 शतकानंतर गिलने सोशल मीडियावर आपल्या फलंदाजीचे काही फोटो शेअर केले. त्या पोस्टखाली फक्त 2 शब्दांचं कॅप्टशन लिहीलं, जे चर्चेत आहे, ‘406, Cool’.

शुभमन गिलने कोणते विक्रम मोडले?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज म्हणून नवा विक्रम.
(ग्लेन मॅक्सवेलचा 201 धावांचा विक्रम मागे टाकला. धावांचा पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा गिल हा मॅक्सवेलनंतरचा दुसरा फलंदाज)

भारतीय कर्णधार म्हणून वनडेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचाही विक्रम.
(वीरेंद्र सेहवागने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावांची खेळी केली होती.)

हेही वाचा – अवघ्या 70 चेंडूंत वादळी शतक! वेस्ट इंडिजच्या आमिर जांगूची तुफान फलंदाजी; भारतासमोर 406 धावांचे विशाल आव्हान

वनडे क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिक द्विशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही गिलचं स्थान!
(रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version