Smriti Mandhana Marriage : स्मृती आणि पलाशच्या विवाहाबाबत मोठी अपडेट, स्मृती मानधनाच्या ‘त्या’ कृतीमुळे चाहते संभ्रमात

स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Smriti Mandhana Marriage : स्मृती आणि पलाशच्या विवाहाबाबत मोठी अपडेट, स्मृती मानधनाच्या ‘त्या’ कृतीमुळे चाहते संभ्रमात

Smriti Mandhana Marriage Postponed : भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) वर्ल्ड कप (World Cup) विजेत्या टीममधली खेळाडू स्मृती मानधना हिचा ठरलेला विवाह (Marriage) पुढे ढकलण्यात (Postponed) आला आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता सांगलीतील (Sangli) मानधना यांच्या फार्म हाऊसवर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह होणार होता. मात्र, श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर सध्या सांगलीतील एका खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

पलाशचीही प्रकृती बिघडली
स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न रद्द झाल्यानंतर, याच दरम्यान रविवारी संध्याकाळी पलाश मुच्छल याची प्रकृतीही बिघडली होती. 'व्हायरल इन्फेक्शन' (Viral Infection) आणि पचनाची समस्या (Digestion Problem) जाणवल्यामुळे त्याला सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी प्रतिक्रिया दिली की, लग्न रद्द झाल्यामुळे पलाश खूपच मानसिक तणावात होता, ज्यामुळे त्याची तब्येत खराब झाली. काही तासांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी पलाशला डिस्चार्ज दिला आणि त्यानंतर सोमवारी सकाळी तो मुंबईला रवाना झाला.

हेही वाचा – Smriti Mandhana’s Father Health Update: स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर; आता तब्येत कशी आहे?

सोशल मीडियावरील पोस्ट्स हटवल्या
या सगळ्या घडामोडींदरम्यान, स्मृती मानधनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नासंबंधीच्या सर्व पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. तिने लग्नाचे तसेच साखरपुड्याचे फोटोही हटवले आहेत. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर पलाश मुच्छलने स्मृतीला 'प्रपोज' केले होते. स्मृतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते, पण आता तिने तो व्हिडिओ देखील डिलीट केला आहे. मात्र, पलाश मुच्छलच्या सोशल मीडिया अकाउंटवर अजूनही या पोस्ट दिसत आहेत.

स्मृतीशिवाय तिच्या भारतीय संघातील मैत्रिणी जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्मृतीच्या लग्नासंदर्भातील पोस्ट्स हटवल्या आहेत. लग्न रद्द झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंतचे लग्नाचे डेकोरेशन हटवले गेले आणि सांगलीमध्ये दाखल झालेले नातेवाईक माघारी परतले.

हेही वाचा – Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने साखरपुड्याची घोषणा करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून हटवला; नेमकं कारण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number