सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल झआली तर त्यावर हजारो लाखो लोक स्वत:चे मत कमेंट्सद्वारे मांडतात. मग जर ती पोस्ट एखाद्या सेलिब्रेटीची असेल तर त्यावर चांगल्यासोबत अनेक लोक ट्रोल करणारी मत मांडतात. याप्रकरणी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना गांगुली यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
सोशल मीडियावर अश्लीलट टिप्पणीच्या टार्गेट झालेल्या डोना गांगुली यांनी कोलकाता पोलिसांकडे पोलिस तक्रार दाखल केली आहे. भारतीय ओडिसी नृत्यांगना डोना गांगुली यांनी बुधवारी रात्री त्यांच्यावर ऑनलाइन आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल तक्रार केली. डोनाने केलेल्या तक्रारीनुसार कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील तिच्या कामगिरीवर एका फेसबुक पेजवरून तिच्यावर सतत अश्लील आणि शरीराला लज्जास्पद टिप्पणी केल्या जात होत्या.
डोनाने कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एका महिला युट्यूबरविरुद्ध सोशल मीडियावर तिच्याबाबत बदनामीकारक सामग्री पसरवल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. डोना गांगुली या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा आहेत. गेली 45 वर्षे त्या एका व्यावसायिक ओडिसी नृत्याचं सादरीकरण करत आहेत. त्यांना त्यांच्या नृत्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने सन्मानित देखील केलं आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याचाी नोंद केली असून तपास सुरु केला आहे.