कोलकाता येथे पार पडलेला दक्षिण आफ्रिक विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. यावेळी दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अवघ्या 1-0 अशी आघाडी घेतली नाही तर ईडन गार्डन्सवर बचावलेल्या सर्वात कमी धावसंख्येचा 53 वर्षांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने मोडला. ईडन गार्डन्सवर सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम 192 धावांचा होता. जो 53 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने ईडन गार्डन्सवर 124 धावांचा बचाव करून तो विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध दणदणीत सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतासमोर 124 धावांचं लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेने दिलेले आव्हान पुर्ण करण्याच्या प्रयत्नात भारताने दुसऱ्या डावात 100 धावा देखील केल्या नाही. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिंकला.
कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी जसप्रीत बुमराहने घेतलेल्या 5 विकेट्समुळे दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या दिवशी 159 धावांवर गाढ झाला. यामुळे भारताकडे विजयासाठी पुढाकार घेण्याकरिता चांगली संधी मिळाली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला 189 धावावंर रोखलं. त्यामुळे भारताला 30 धावांचीच आघाडी मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेने दमदार कमबॅक केलं. त्याचसोबत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 154 धावा केल्या आणि भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य ठेवले. तथापि, त्या लक्ष्यासमोर भारतीय फलंदाजी वाईटरित्या कोसळली.
दरम्यान दुसर्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायच झाल तर, दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्स गमावून 93 धावा केल्या ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 63 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेसाठी कॅप्टन बवुमा याने सर्वाधिक आणि नाबाद 55 धावा केल्या. तर कॉर्बिन बॉश याने 25 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल बोलायच झाल तर रवींद्र जडेजाने 4 गडी बाद केले, तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. त्याचसोबत अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 1-1 खेळाडू बाद केले.