Smriti-Palash News: मुछालने घेतले स्मृतीच्या वडिलांचे आशीर्वाद! एका व्हायरल व्हिडिओमुळे स्मृती-पलाशचं नातं पुन्हा जुळणार?

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मंधाना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली होती.

Smriti-Palash News: मुछालने घेतले स्मृतीच्या वडिलांचे आशीर्वाद! एका व्हायरल व्हिडिओमुळे स्मृती-पलाशचं नातं पुन्हा जुळणार?

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मंधाना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली होती. संगीतकार पलाश मुछाल याच्यासोबत ठरलेलं लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधाना मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता एका व्हिडिओमुळे हे दोघे पुन्हा एकत्र येणार असलेल्या चर्चांनी जोर धरला आहे.

सोशल मीडियावर स्मृतीच्या वडिलांचा आणि पलाशच्या बहिणीचा एक व्हिडिओ समोर आला. यात मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना आणि गायक मिथुन आणि त्याची पत्नी तसेच पलाशची बहीण पलक मुछाल हे बाहेर पडताना दिसले. यावेळी पलकने स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडलेलं पाहायला मिळाल. तिचा त्यांच्याप्रती असलेला आदर पाहून त्यांनी देखील हसतमुखाने तिला आशीर्वाद दिल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे कपल पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. या व्हायरल व्हिडिओवर स्मृती मंधाना किंवा मुछाल कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

हेही वाचा- Ishan Kishan Girlfriend: ‘फेमस होण्यासाठी अश्लील कपडे, छोट्या चित्रपटांत काम’… ईशान किशनच्या फॅन्सनी त्याच्या गर्लफ्रेंडचे जुने व्हिडिओ आणले समोर; अदिती हुंडिया होतेय प्रचंड ट्रोल
23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि पलाश यांची लग्नगाठ बांधली जाणार होती मात्र काही ना काही कारणाने या लग्नाला विलंब होत होता. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. नंतर मात्र हे लग्न मोडले गेले. स्मृतीच्या मैत्रिणींनी पलाशला दुसऱ्या एका महिलेसोबत पाहिल्याचे आणि त्याने फसवणूक केल्याचे आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासंबंधी पलाश आणि त्या मुलीचे काही चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पलाशने हे आरोप फेटाळून लावले असले तरी, दोघांनीही अधिकृतपणे सोशल मीडिया पोस्टद्वारे वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या नवीन व्हिडिओमुळे दोघांचे नाते पुन्हा चर्चेत आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number