Mirabai Chanu: मीराबाई चानूने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक

 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेतील हे तिच्या कारकिर्दीतील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. या विजयानंतर भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मीराबाईने आपले वर्चस्व सिद्ध […]

Mirabai Chanu: मीराबाई चानूने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक

 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेतील हे तिच्या कारकिर्दीतील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. या विजयानंतर भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मीराबाईने आपले वर्चस्व सिद्ध केले. 'स्नॅच' प्रकारात तिने आत्मविश्वासाने 82 किलो वजनाची पहिली लिफ्ट निवडली आणि प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने 82 किलो वजन उचलत नवीन राष्ट्रकुल विक्रमाची नोंद केली. मात्र, त्यावरच न थांबता तिसऱ्या प्रयत्नात 85 किलो वजन उचलून तिने स्वतःचाच विक्रम मोडत नवा इतिहास रचला.

'क्लीन अँड जर्क' फेरीत मीराबाईसमोर 105 किलो वजनाचे आव्हान होते. पहिल्या प्रयत्नात तिला यश आले नाही. मात्र, दडपणाखाली शांत राहण्याची तिची क्षमता पुन्हा एकदा दिसून आली. दुसऱ्या प्रयत्नात तिने 105 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले आणि सुवर्णपदकावर आपला हक्क निश्चित केला.

या यशामुळे 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकसंख्येत वाढ झाली आहे. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये ऋषिकांत सिंगच्या माध्यमातून रौप्यपदकाची कमाई केली होती, तर झंडू कुमार याने पॅरा वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मीराबाईच्या सुवर्णपदकामुळे भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्ण मिळाले आहे. स्पर्धेनंतर मीराबाई चानू अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फळ अखेर सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुन्हा एकदा भारतीय वेटलिफ्टिंगची ताकद जगासमोर सिद्ध झाली असून देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number