आयपीएल 2026 चा 19 वा हंगाम यंदा चांगलाच गाजत आहे. अशातच आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना पार पडत आहे. यावेळी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा मान हैदराबादला दिला. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्मा मैदानात येताच त्याने संपूर्ण स्टेडियमचं लक्ष स्वतःकडे ओढलं आहे.
अभिषेक शर्माने सुरुवातीला पहिल्या ओव्हरच्या 2 बॉलमध्ये 3 धावा केल्या. असचं त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये केलं. मात्र खरा खेळ त्याने चौथ्या ओव्हरपासून खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या ओव्हरमध्ये त्याने 2 चौकार तर पाचव्या ओव्हरमध्ये 13 धावा पुर्ण करत 25 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी पूर्ण केली. तो इथेच थांबला नाही. अवघ्या 47 बॉलमध्ये त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यावेळी अभिषेक शर्माने 68 बॉलमध्ये 10 चौकार आणि 10 षटकार मारत 135 नाबाद धावांची खेळी केली.
अभिषेक शर्माचं या पर्वातील हे पहिलं शतक आहे. तर टी20 क्रिकेटमधील हे त्याच नववं शकत आहे. अभिषेक शर्माने आपल्या तोडफोड फलंदाजीसह दिल्लीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. यावेळी सनरायझर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 242/2 अशी भक्कम धावसंख्या उभारली. अभिषेकने आघाडी घेतली आणि बाकीच्या फलंदाजांनी त्याला साथ दिली, ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादने जवळपास परिपूर्ण फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारली.