MI vs SRH IPL 2026 : रायन रिकेल्टनची शतकी खेळी वाया! हैदराबादने 6 विकेट्सने उडवला मुंबईचा धुव्वा

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात हैदराबादने 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पराभव केला.

MI vs SRH IPL 2026 : रायन रिकेल्टनची शतकी खेळी वाया! हैदराबादने 6 विकेट्सने उडवला मुंबईचा धुव्वा

29 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सहावा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात हैदराबादने 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रायन रिकेल्टनने 8 षटकार आणि  10 चौकार मारत नाबाद 123 धावा केल्या.

त्याचसोबत विल जॅक्सने 46 धावा तर कर्णधार हार्दिक पंड्याने 31 धावा आणि नमन धीरने 22 धावांसह मुंबई इंडियन्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 243 धावा करता आल्या. तर गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या आणि ट्रेंट बोल्ट या दोघांनी प्रत्येकी 1-1 असा बळी घेतला. तसेच अल्लाह गजनफरने अभिषेक शर्मा आणि इशान किशन या दोघांना एकामागोमाग एक बाद करत हैदराबादला सलग 2 झटके दिले. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

हेही वाचा- Rohit Sharma: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! रोहित शर्मा अजूनही बाहेर, हार्दिक पांड्याने दुखापतीबाबत दिलं मोठं अपडेट

मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचे पाठलाग करत हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने 52 बॉलमध्ये 129 धावांची धमाकेदार सुरुवात करून दिली. त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि नितीश रेड्डी या जोडीने 40 बॉलमध्ये 80 धावांची भागीदारी करत हैदराबादला 18.4 ओव्हरमध्ये 249 धावा करत विजय मिळवता आला. हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये प्रफुल हिंगे याने 2 विकेट्स मिळवल्या. तर साकीब हुसैन, एशान मलिंगा आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. अशाप्रकारे हैदराबादने 18.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून 249 धावा केल्या. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number