आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका सुरु झाली आहे. सुरुवातीला धमाकेदार खेळाडूवृत्ती दाखवणाऱ्या टीम इंडियाचे सध्याचे प्रदर्शन चांगले राहिलेले नाही. या मालिकेदरम्यान टीम इंडियामध्ये बरेच मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामधील महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. यावेळी टीम इंडियातील सध्याची परिस्थिती पाहता सूर्यकुमार यादवने आपल्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर त्याच्या नावाने पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सूर्यकुमार यादवने चाहत्यांना केले. या सर्व अफवांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. तसेच आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी होणाऱ्या टीकांकडे लक्ष न देता त्याने वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाबद्दल आपला अभिमान व्यक्त करताना, संघातील सर्व खेळाडूंना आपला कायम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी त्याने पोस्ट करत म्हटले की, “मला संघासाठी खूप आनंद होत आहे आणि मी त्यांना नेहमीच सर्वोत्तम शुभेच्छा देतो. मला माहित आहे की मुले आपले सर्वस्व पणाला लावत आहेत आणि त्यांना माझा पूर्ण पाठिंबा नेहमीच असेल. वैभवसाठी एक विशेष शब्द – तू एका अत्यंत रोमांचक प्रवासाच्या सुरुवातीला आहेस. प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहा. माझ्या असेही लक्षात आले आहे की, एक विधान ऑनलाइन प्रसारित केले जात आहे, जे खोट्या पद्धतीने माझ्या नावावर खपवले जात आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी असे कोणतेही विधान केलेले नाही किंवा त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही. कृपया पडताळणी न झालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती शेअर करू नका. भारतीय क्रिकेट, माझे सहकारी खेळाडू आणि खेळाप्रती असलेला माझा पाठिंबा, माझ्या नावावर खोट्या पद्धतीने खपवलेल्या शब्दांपेक्षा नेहमीच अधिक बोलका असेल.” टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली असून सूर्यकुमार यादवच्या या पोस्टने सोशल मीडियावरील चाहत्यांची मने जिंकली आहेत.
? pic.twitter.com/kluJiuyYwn — Surya Kumar Yadav (@surya_14kumar) July 7, 2026