T20 World Cup Final: भारत-न्यूझीलंड अंतिम सामना रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या ICC चे नियम

सामन्याचा निकाल लावण्यासाठी किमान 10-10 षटकांचा खेळ होणे अनिवार्य आहे. जर रविवारी खेळ सुरू होऊन थांबला, तर...

T20 World Cup Final: भारत-न्यूझीलंड अंतिम सामना रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या ICC चे नियम

T20 World Cup Final : 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा महामुकाबला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. रविवार, 8 मार्च 2026 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र, जर या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द झाला, तर चॅम्पियन कोण ठरणार? या प्रश्नाचे उत्तर आयसीसीने (ICC) आपल्या नियमावलीतून स्पष्ट केले आहे.

राखीव दिवस आणि अतिरिक्त वेळेची तरतूद
आयसीसीने या भव्य अंतिम सामन्यासाठी कोणताही धोका पत्करलेला नाही. जर 8 मार्च रोजी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर 9 मार्च हा दिवस 'राखीव दिवस' (Reserve Day) म्हणून ठेवण्यात आला आहे. सामन्याचा निकाल लावण्यासाठी किमान 10-10 षटकांचा खेळ होणे अनिवार्य आहे. तसेच, सामना वेळेत पूर्ण करण्यासाठी आयसीसीने 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळही दिला आहे. जर रविवारी खेळ सुरू होऊन थांबला, तर सोमवारी सामना जिथे थांबला होता, तिथूनच पुढे सुरू केला जाईल.

हेही वाचा – IND vs NZ T20 World Cup: वर्ल्ड कप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर, चिंता वाढली; पण 'त्या' 3 अडथळ्यांचं पुन्हा टीम इंडियासमोर आव्हान

दोन्ही संघ होणार संयुक्त विजेते?
जर दुर्दैवाने 8 आणि 9 मार्च अशा दोन्ही दिवशी पावसाने बॅटिंग केली आणि खेळणे अशक्य झाले, तर आयसीसीच्या नियमानुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना 'संयुक्त विजेते' (Joint Champions) घोषित केले जाईल. क्रिकेटच्या इतिहासात अशी परिस्थिती दुर्मिळ असली तरी भारतीय संघासोबत 2002-2003 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असे घडले होते, जेव्हा भारत आणि श्रीलंकेला संयुक्त जेतेपद देण्यात आले होते.

टीम इंडियाकडे इतिहास घडवण्याची संधी
भारतीय संघाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. जर यंदाही भारताने विजय मिळवला किंवा सामना रद्द होऊन संयुक्त जेतेपद मिळाले, तर टीम इंडिया सलग दोनदा चॅम्पियन बनणारा जगातील पहिला संघ ठरेल. विशेष म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताला आजवर न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळे अहमदाबादच्या मैदानावर हा 'स्टॅट्स' बदलण्यासाठी रोहित सेनेला आपली सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2026: 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'साठी 'या' 8 संघांमध्ये चुरस; यादीत भारताचा फक्त एक खेळाडू, तर इतर संघातील…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number