England vs India: इंग्लंडला भिडण्यासाठी टीम इंडिया सज्ज! विराट कोहलीचे पुनरागमन, पण शतकी खेळी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला डच्चू

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

England vs India: इंग्लंडला भिडण्यासाठी टीम इंडिया सज्ज! विराट कोहलीचे पुनरागमन, पण शतकी खेळी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला डच्चू

England vs India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला या संघातून वगळण्यात आले आहे.

विराटच्या फिटनेसवर लक्ष; हार्दिक पांड्या अजूनही बाहेरच
दुखापतीतून सावरत असलेल्या विराट कोहलीच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप पूर्ण खात्री नसल्याने, त्याचा या मालिकेतील सहभाग फिटनेस चाचणीवरच अवलंबून असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात विराटला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळता आले नव्हते. दरम्यान, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अद्याप संघात स्थान मिळवू शकलेला नाही; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही.

हर्षित राणाला संधी आणि युवा गुरनूर ब्रारचे स्थान कायम
वेगवान गोलंदाज हर्षित राणाला अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती, परंतु आता त्याच्यावर विश्वास दाखवत इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे अशा दोन्ही संघांमध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे. तसेच, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत 7 बळी घेणाऱ्या गुरनूर ब्रारने संघात आपले स्थान कायम राखले आहे. मात्र, फिरकी गोलंदाज हर्ष दुबेला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

फिरकी अष्टपैलू म्हणून अक्षरचे पुनरागमन 
या संघात फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचेही पुनरागमन झाले असून, अनुभवी रवींद्र जडेवाबद्दल बीसीसीआयची भूमिका आता स्पष्ट होत चालली आहे. वॉशिंग्टन सुंदरला अंतिम 11 मध्ये अष्टपैलू म्हणून सातत्याने मिळणाऱ्या संधीमुळे, जडेजा 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या भविष्यातील नियोजनाचा भाग नसल्याचे चित्र दिसत आहे. संघात श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा झंझावात! अवघ्या 11 चेंडूंत ठोकलं अर्धशतक; मोडीत काढला 20 वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

इंग्लंड वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ (Team India Squad):
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number