India vs Afghanistan: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; रोहित-विराटचे पुनरागमन; ‘या’ 4 नव्या चेहऱ्यांना संधी

जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

India vs Afghanistan: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; रोहित-विराटचे पुनरागमन; ‘या’ 4 नव्या चेहऱ्यांना संधी

India vs Afghanistan: सध्या संपूर्ण देशात इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2026) थरार सुरू असून याचा अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएल संपताच भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी 19 मे रोजी गुवाहाटी येथे पुरुष निवड समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये दोन्ही मालिकांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. भारत जूनमध्ये अफगाणिस्तानचे यजमानपद भूषवणार असून, दोन्ही संघांमध्ये एक ऐतिहासिक कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून मुल्लानपूर येथे खेळवला जाणार असून यासाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे.

अफगाणिस्तानचा दुसरा कसोटी सामना  
क्रिकेट इतिहासाचा विचार केला तर, सन 2018 नंतर अफगाणिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. सन 2018 मध्येच अफगाणिस्तानने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतासामान्याविरुद्ध खेळून कसोटी क्रिकेटमध्ये आपले अधिकृत पदार्पण केले होते. त्या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी प्रचंड पराभव केला होता.

रोहित-विराट वनडे संघात; उपकर्णधारपदात बदल आणि शमीला डच्चू:
अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे स्थान कायम आहे. मात्र, एकदिवसीय संघातून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वगळण्यात आले असून, कसोटी संघात मात्र त्याला स्थान टिकवता आले आहे. दरम्यान, कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आता ऋषभ पंतऐवजी के.एल. राहुलकडे सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडे निवड समितीने पुन्हा एकदा पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मुख्य निवडक अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, बैठकीत शमीच्या नावावर कोणतीही चर्चा झाली नाही.

वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला विश्रांती 
आगामी इंग्लंडच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या कामाचा ताण (workload) नियंत्रित करण्यासाठी त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत संघात मानव सुथार, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. मानव सुथारची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड झाली आहे, तर गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी कसोटी व वनडे अशा दोन्ही संघांमध्ये जागा मिळवली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रिन्स यादवला पहिल्यांदाच भारतीय एकदिवसीय संघात पाचारण करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक 
या दौऱ्याची सुरुवात 6 जून रोजी न्यू चंदीगड येथे पहिल्या कसोटी सामन्याने होईल, जो सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल; पहिला एकदिवसीय सामना 14 जून रोजी धर्मशाला येथे, दुसरा एकदिवसीय सामना 17 जून रोजी लखनौ येथे, तर तिसरा आणि अंतिम सामना 20 जून रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. हे सर्व एकदिवसीय सामने दुपारच्या 1:30 वाजता सुरू होतील.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi IPL 2026: तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ खेळाडू; अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीवर माजी दिग्गज खेळाडू फिदा

कसोटीसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number