T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; सराव सत्रात ‘हा’ खेळाडू जखमी

भारतीय संघ सध्या अहमदाबादमध्ये असून तिथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रंगणार आहे.

T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; सराव सत्रात ‘हा’ खेळाडू जखमी

T20 World Cup 2026:  यंदाच्या टी-20 विश्वचषकातील लीग टप्प्यातील सर्व 4 सामने जिंकून 'सुपर 8' टप्प्यात पोहोचलेल्या टीम इंडियासमोर आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. रविवार, 22 फ्रेब्रूवारी रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सराव सत्रादरम्यान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याने मारलेला एक शक्तिशाली शॉट थेट सिराजच्या गुडघ्याला लागला, ज्यामुळे त्याला सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

अहमदाबादमध्ये सराव करताना झाला अपघात
भारतीय संघ सध्या अहमदाबादमध्ये असून तिथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रंगणार आहे. मोहम्मद सिराजने या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात 3 विकेट्स घेत दमदार कामगिरी केली होती, मात्र जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर त्याला अंतिम 11 मधून बाहेर बसावे लागले होते. शुक्रवारी संध्याकाळी नेट्समध्ये सराव करत असताना हार्दिक पंड्याचा शॉट सिराजला लागला. या दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सिराज जखमी होणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

हेही वाचा – T20 World Cup Super-8 : सुपर-8 मध्ये एखादा सामना पावसात वाहून गेला तर कोणाचे होणार नुकसान? नेमका काय आहे नियम, जाणून घ्या

अक्षर पटेलचे पुनरागमन आणि वरुण चक्रवर्तीचे कौतुक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'सुपर 8' सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. उप-कर्णधार अक्षर पटेल, ज्याला शेवटच्या लीग सामन्यात विश्रांती देण्यात आली होती, त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते. दरम्यान, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल यांनी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे. वरुणने आतापर्यंत या विश्वचषकात असाधारण कामगिरी केली असून तो संघासाठी मुख्य विकेट घेणारा गोलंदाज असल्याचे प्रशिक्षकांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

भारताची संभाव्य प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ खालीलप्रमाणे असू शकतो:
अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number