आयपीएल नुकतीच संपल्यानंतर आता क्रिकेटप्रेमी पुढील टी20 वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. अशातच सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांना यावेळी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आगामी टी-20च्या कर्णधार पदावरुन हटवलं जाण्याची बातमी समोर आली आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव ऐवजी टीम इंडियातील इतर खेळाडूंना कर्णधार पदाची संधी मिळू शकते. आज बीसीसीआयची एपेक्स काउंसिल बैठक घेऊन नव्या टी20 कॅप्टनच्या नावावर शिक्कामोर्तब करेल.
यावेळी निवडकर्ते आणि बीसीसीआय अधिकारी गौतम गंभीर सोबत चर्चा करतील. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच सूर्यकुमारच्या कप्तानीखाली भारताने अहमदाबाद येथे न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता. मात्र टी-20 विश्वचषक 2026 आणि आयपीएल 2026 मधील सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खराब फॉर्ममुळे भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. तर आता भारतीय संघाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार? याकडे सर्वांच लक्ष लागलेल आहे. याचदरम्यान सध्या पाच नवं कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
हेही वाचा- FIFA World Cup 2026: FIFA विश्वचषकावर मोठं संकट! 97 सामने धोक्यात; धक्कादायक अहवालामुळे वाढली चिंता
सूर्यकुमारनंतर टीम इंडियाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार?
तिलक वर्मा
यावेळी तिलक वर्मा त्याची आयपीएलमधील खेळी पाहून टी20 टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तिलकने 152 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या आहेत. तसेच 2025 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने 14 सामन्यांत 460 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या एवढचं नव्हे तर नुकतीच श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या 'भारत अ' संघाचे कर्णधारपद तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे.
श्रेयस अय्यर
सध्या श्रेयसचा फॉर्म पाहता बीसीसीआय श्रेयस अय्यरला तिन्ही फॉरमॅटचा भविष्यातील नियमित खेळाडू म्हणून पाहत आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने 14 सामन्यांत 55.33 ची सरासरी आणि 168.81 स्ट्राईक रेटने 498 धावा काढल्या. यावेळी सूर्यकुमारच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो अगदी योग्य दावेदार आहे.
संजू सॅमसन
नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या विजयात संजू सॅमसनचा मोलाचा वाटा आहे. विश्वचषकानंतर आयपीएलमध्येही त्याने आपली अप्रतिम फॉर्म कायम ठेवला. एक यष्टिरक्षक-सलामीवीर आणि कर्णधार म्हणून तो अंतिम 11 खेळाडूंच्या संघात अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवण्याचे उत्तम स्वातंत्र्य व्यवस्थापनाला मिळवून देतो.
इशान किशन
गेल्या वर्षी इशान किशनच्या नेतृत्वाता झारखंडने देशातील सर्वात मोठी स्पर्धा 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी' जिंकली होती. देशासाठीच नव्हे तर देशांतर्गत देखील इशानने आपली धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. तर यंदा त्याला सुरुवातीच्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादचे (SRH) नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली.
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत त्याने 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. इतकचं नव्हे तर बुमराहकडे कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याचा, तसेच दोन टी-20 सामन्यांचा अनुभव आहे. मात्र बुमराहच्या दुखापती आणि त्याचा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.