IND vs NZ Ahmedabad Narendra Modi Stadium : 2023 च्या वर्ल्ड कपची आठवण पुन्हा जागी! ‘मोदी स्टेडियम’वरील अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय

8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs NZ Ahmedabad Narendra Modi Stadium : 2023 च्या वर्ल्ड कपची आठवण पुन्हा जागी! ‘मोदी स्टेडियम’वरील अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय

गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सेमीफायनल सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. भारताने इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. यानंतर 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्याची चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाने अहमदाबादमधील हॉटेल आणि स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाने पराभव पत्कारल्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांना अजून देखील त्या पराभवाची झळ बसत अल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. अशातच टीम इंडियाने संघात काही बदल केल्याचे समोर येत आहेत. 

हेही वाचा- T20 World Cup 2026 Final: टीम इंडियातील 'हे' 6 खेळाडू प्रथमच अनुभवणार विश्वचषकाचा थरार h

2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनल दरम्यान टीम इंडियाला आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये मिळाला होता. आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, अहमदाबादमध्ये फायनलमध्ये पोहोचलेल्या पहिल्या संघाला आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये ठेवले जाते. तर दुसऱ्या फायनलिस्ट संघासाठी ताज स्कायलाईन हॉटेलची व्यवस्था असते. त्यामुळे यावेळी देखील तोच हॉटेल देण्यात येण्याची शक्यता असून त्या हॉटेलमध्ये यावेळी संघ थांबणार नाही. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही टीम इंडिया ‘होम’ ड्रेसिंग रूमऐवजी ‘व्हिजिटिंग टीम’च्या ड्रेसिंग रूमचा वापर करू शकते, अशी माहिती समोर येत आहे. या निर्णयामागे ‘जिंक्स’ किंवा नकारात्मक इतिहास मोडण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा- Navjot Singh Sidhu on Mohammad Amir : "मला तर वाटतं ढोंगी बाब…" भारताविरुद्ध भाकित करणाऱ्या मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी चांगलेच खडेबोल सुनावले

टीम इंडियाने आतापर्यंत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 10 टी20 सामने खेळले असून त्यातील 3 सामन्यात पराभव पत्कारला आहे, तसेच 7 सामन्यात विजयी झाले आहेत. टीम इंडियाने सध्या सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एकमेव सामन्यात पराभव पत्कारला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number