Monday, May 11, 2026 11:00:11 AM

IPL 2026, KKR vs LSG: कोलकाताची सेना लखनौवर भारी! सामन्यात असं काय घडलं की, निकाल थेट सुपर ओव्हरमध्ये आला

काल 26 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये चुरस रंगली. हा सामना आयपीएल 2026 मधील पहिला सामना ठरला जो सुपर ओव्हरमध्ये गेला.

ipl 2026 kkr vs lsg कोलकाताची सेना लखनौवर भारी सामन्यात असं काय घडलं की निकाल थेट सुपर ओव्हरमध्ये आला

काल 26 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये चुरस रंगली. दरम्यान कालच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला असून लखनौने पहिला फलंदाजीचा मान कोलकाताला दिला. यावेळी कोलकाताकडून 7 गडी गमवून 155 धावा उभारल्या गेल्या. ज्यामुळे लखनौ समोर 156 धावांच आव्हान होत. हे आव्हान पुर्ण करत लखनौने शेवटच्या षटकात 17 धावांची गरज असताना 16 धावा केल्या.

शेवटच्या चेंडूवर शमीने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर षटकार मारून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. ज्यामुळे आयपीएल 2026 च्या हंगामात ओव्हरमध्ये जाणारा हा पहिला सामना ठरला. सुपर ओव्हरमध्ये लखनौला विजयासाठी 2 धावा देण्यात आल्या होत्या, मात्र प्रथम फलंदाजी करत एकच धाव काढली. तर कोलकाताने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून या सामन्याचा निकाल आपल्या बाजूने वळवला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात 2 गुण पडले आहे. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा- MS Dhoni: फिट असूनही धोनी मैदानाबाहेर! CSK साठी खेळण्यास स्वतःच नकार; नेमकं कारण काय?

यावेळी प्रथम फलंदाजी करत कोलकाताकडून अत्यंत खराब सुरुवात झाली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे 10, अंगकृष रघुवंशी 9 तर कॅमेरून ग्रीन 34 धावा केल्या. तर कोलकाताचा वादळी खेळी खेळणारा फलंदाज रिंकू सिंग  मैदानात उतरला. त्याने 35 चेंडूंत 1 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 83 धावांची स्फोटक खेळी केली. ज्यामुळे कोलकात्याचा डाव 100 धावांच्या आत संपेल असे वाटत असताना कोलकात्याला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. दरम्यान गोलंदाजांमध्ये मोहसिन खानने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर जॉर्ज लिंडेने एक बळी घेतला. अशा प्रकारे केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. 

कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत ऋषभ पंतने 42 धावा केल्या तर एडन मार्करम याने 31 धावा तर आयुष बडोनी याने 24 धावांची भागीदारी केली. तर गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि वैभव अरोरा या दोघांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर कॅमेरॉन ग्रीन याने एक बळी घेतला. रिंकू सिंगच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. एलएसकेनेही 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या. यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

लखनौकडून सुपर ओव्हरसाठी निकोलस पूर आणि एडन मार्करम हे दोघे प्रथम मैदानात उतरले. मात्र कोलकाताच्या सुनील नसरीनने निकोलस पूरनला आपल्या ताफ्यात पाठवले. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. त्याने एक धाव घेत मार्करमला स्ट्राईक दिली. त्यावेळेस तिसऱ्या चेंडूवर मार्करमने जोरदार षटकी फटका मारला मात्र रोवमॅन पॉवेलने झेल पकडला. त्यामुळे कोलकात्यासमोर अवघ्या दोन धावांचे आव्हान होते. कोलकाताकडून मैदानात उतरलेल्या रिंकू सिंहने प्रिन्स यादवच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर कोलकात्याचा विजय झाला.


सम्बन्धित सामग्री