Saturday, December 06, 2025 12:12:25 PM

IND vs PAK : कॅच पकडूनही नॉटआऊट दिल! टीम इंडियाने अंपायरला आट्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?

काल खेळवण्यात आलेला एशिया कप रायझिंग स्टार 2025 टूर्नामेंटमधील इंडिया ए आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चर्चेत आला आहे.

ind vs pak  कॅच पकडूनही नॉटआऊट दिल टीम इंडियाने अंपायरला आट्यात घेतले नेमकं प्रकरण काय

काल खेळवण्यात आलेला एशिया कप रायझिंग स्टार 2025 टूर्नामेंटमधील इंडिया ए आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चर्चेत आला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की, दोन्ही संघात कोणत्या न कोणत्या कारणावरुन वाद होणे सहाजीक आहे. काल पार पडलेला सामना हा एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या सामन्यात अंपायरमुळे मोठा वाद निर्माण झाला.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान समोर 136 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर पाकिस्तानकडे फलंदाजी आल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज माज सदाकतने अवघ्या 31 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या, त्यानंतर दहाव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनवर असलेल्या नेहल वढेराने बाऊंड्रीजवळ त्याचा कॅच घेतला. मात्र बाऊंड्री लाईन ओलांडण्यापूर्वी त्याने चेंडू दुसऱ्या फिल्डरकडे फेकला आणि त्याची विकेट घेतली. यामुळे एकीकडे भारतीय संघ खुश झाला होता.

तर दुसरीकडे माज सदाकत पॅव्हेलियनकडे होता आणि नवा फलंदाज मैदानात उतरत होता. मात्र इथे अंपायरने गेम फिरवला. अंपायरने सदाकतला थांबवलं आणि रिप्ले चेक केला. रिप्लेमध्ये हे स्पष्ट दिसत होते की, नेहल वढेराने बाऊंड्री लाईनला स्पर्श न करताच चेंडू दुसऱ्या फिल्डरला दिला होत. ज्यामुळे माज सदाकत विकेट गेल्याचही स्पष्ट होत होते. पण थर्ड अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं. ज्यामुळे संताप उडालेल्या टीम इंडियाने अंपायरलं घेरलं. एवढंच नव्हे तर टीम इंडियाचा कोचिंग स्टाफही फोर्थ अंपायरशी चर्चा करत होता.

अंपायरचा हा निर्णय योग्य की अयोग्य ?
जून 2025 मध्ये ICCने नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलने नियमांत नुकतेच तीन मोठे बदल केले होते. त्यानुसार वढेराने घेतलेल्या कॅचवर तिसरा नियम लागू झआला. तो म्हणजे, जर एखाद्या फिल्डरने बाऊंड्री लाईन ओलांडण्याआधी बॉल दुसऱ्या फिल्डरकडे फेकला तर त्या फिल्डरला बॉल डेड होण्यापूर्वीच बाऊंड्री लाईनच्या आत यावं लागेल, तरच तो कॅच हा आऊट मानला जातो. जर तसं झालं नाही तर तो फलंदाज आऊट न होता, त्या फलंदाजाला 4 धावा दिल्या जातात. भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना कॅचिंग नियमामधील या बदलाची माहिती नव्हती, ज्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला.

दरम्यान काल पार पडलेला भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात पाकिस्तानने 8 विकेट्ससह भारताचा पराभव केला. मॅच जरी एकतर्फी झाली असली तरी या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात सदाकतनेची खेळी महत्त्वाची ठरली. 


सम्बन्धित सामग्री