IPL 2026 अर्ध्यापेक्षा जास्त पार पडले आहे. प्रत्येक संघाने ७ पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. कोणते संघ उपांत्यफेरीसाठी पात्र होतील ज्याचं जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स चांगल्या परिस्थितीत दिसत आहेत. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना लढा देत पुढे आगेकूच करताना दिसतायेत. चेन्नईची सुरूवात खराब झालेली मात्र त्यानंतर तिन्ही काही सामने जिंकले आहेत. पण चेन्नईचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे हंगामाबाहेर गेले आहेत. त्याचा फटका चेन्नईला बसेल असं वाटतंय. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संपूर्ण हंगामात विजयासाठी तरसताना दिसले. या तिन्ही संघांना योग्य 'कॉम्बिनेशन' अर्धा हंगाम झाला तरी मिळालेले दिसत नाहीये.
मुंबई इंडियन्स –
IPL 2026 च्या आधी मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात बलाढ्य आहे असं म्हटलं जात होतं, मात्र मैदानावर मुंबईचं काहीच चाललं नाही. बुमराह, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हे पूर्णपणे फ्लॉप झाले तर रोहित शर्मा दुखापतीमुळे बऱ्याच सामन्यांना मुकला. अल्लाह गजनफर आणि रायन रिकल्टन यांनी चांगली कामगिरी केली. या दोघांशिवाय इतर कोणी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले नाही. हार्दिक पांड्या याच्या 'कॅप्टीनशिप'वर बरेच प्रश्न उठवले गेले. त्याच्यासोबत मुंबईचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने घेतलेल्या निर्णयांवरदेखील शंका उठवल्या गेल्या. मुंबई पहिल्या नऊ सामन्यात फक्त २ सामने जिंकू शकले. ही कामगिरी मुंबईसारख्या मोठ्या संघासाठी लाजिरवाणी आहे. हार्दिक पांड्या त्याची जागी टिकवेल पण महिला जयवर्धने यांची हकालपट्टी होऊ शकते. जयवर्धने याने मुंबईला तीन वेळा आयपीएलचा खिताब जिंकवून दिला पण रोहित शर्मा विना त्याला एकदाही तो चमत्कार करता आलेला नाही. मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने जर कठोर निर्णय घ्यायचा ठरवला, तर वेळे प्रसंगी हार्दिक आणि जयवर्धने या दोघांना संघातून वगळण्यात येईल.
कोलकाता नाईट रायडर्स –
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने संघात मोठे फेरबदल केले. कोलकताचे बरेच खेळाडू दुसऱ्या संघात गेले, तर काहींनी स्वतः बाहेर जायचा निर्णय घेतला. मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताची रणनीती पूर्णपणे फेल गेली. वेंकटेश अय्यरला २३ कोटी देऊन संघात घेतले पण त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे वेंकटेश अय्यरला संघातून काढलं गेलं. या हंगामात कोलकाताच्या कॅमरून ग्रीन 25.20 कोटी देऊन संघात समाविष्ट केले. कोलकाताने आंद्रे रसल यालादेखील निवृत्ती घ्यायला लावली. हर्षित राणा दुखापतीमुळे तर मुस्ताफिझूर रहमान भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे संपूर्ण हंगामाला मुकले. मथीशा पाथिराना दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. श्रेयस अय्यरनंतर कोलकाताला चांगल्या कर्णधाराची गरज आहेच, त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या जागेवरदेखील प्रश्नचिन्ह आहे. अजिंक्य रहाणे याची फलंदाजी आणि कर्णधार म्हणून कामगिरी असमाधानकारक राहिली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सदेखील त्यांच्या संघात बरेच फेरबदल करताना दिसू शकतात.
हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिनच्या मुलावर पैशांचा पाऊस! अर्जुन तेंडुलकरवर तब्बल इतक्या लाखांची बोली; कोणत्या संघाने दिली संधी?
लखनऊ सुपर जायंट्स –
लखनऊ सुपर जायंट्स यांनी केएल राहुल याला काढून रिषभ पंत याला नवीन कर्णधार बनवलं. त्यासाठी त्यांनी २७ करोड रुपये मोजले. पण लखनऊची कामगीरी केएल राहुलच्या काळात चांगली होती, मात्र आताची कामगिरी निराशाजनक राहिली. २०२२ ते २०२४ या काळात बलाढ्य दिसणारा लखनऊ संघ आता दुबळा वाटतो. लखनऊची फलंदाजीची संपूर्ण हंगामात निराशनजनक होती. पंत आणि पूरन मुख्यतः या दोघांनी त्यांच्या फलंदाजीने निराश केलं. या दोघांपैकी एक किंवा वेळे प्रसंगी दोघांना डच्चू मिळू शकतो. रिषभ पंत आणि निकोलस पूरन यांना संघातून काढलं तर ४८ कोटी रक्कम त्यांना पुढच्या हंगामासाठी मिळेल. लाखनऊला एका चांगल्या फिरकी गोलंदाजाचीदेखील गरज आहे. रवी बिष्णोईच्या जाण्याने झालेली पोकळी कोणी भरू शकलेला नाही. मुंबई आणि कोलकाता या दोघांपेक्षा लखनऊला सांघात फेरबदल करण्याची गरज जास्त आहे. रिषभ पंत याला संघातून जाऊ देण्याचा निर्णय ते घेतील का हा मोठा प्रश्न आहे. निकोलस पूरनच्या बाबतीत लखनऊ सहनशीलता ठेवले हेही बघण्यायोग्य असेल.
या तीन संघांनी घेतलेले निर्णय हे अनेकदा खटकण्यासारखे होते. कोणत्याही संघाचे अधिकतर निर्णय हे कर्णधारच घेतो. त्यामुळे इतर चांगल्या खेळाडूंपेक्षा एक चांगला कर्णधार संघात समाविष्ट करण्याकडे या तिन्ही संघांचा कल असेल. पुढच्या आयपीएलच्या लिलावात खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करण्याची शर्यत या तीन संघांमध्ये दिसेल.