Ashes Series 2025: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स सध्या दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या अॅशेसमध्ये खेळण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले की, जर कमिन्स वेळेवर तंदुरुस्त न झाल्यास 36 वर्षीय स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करेल. कमिन्स दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर राहणार आहे.
हेही वाचा - Mohammed Shami: रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीचा जलवा! सात महिन्यांनंतर मैदानात पुनरागमन; 7 विकेट घेऊन दिलं ‘फिटनेस टेस्ट’ला उत्तर
स्मिथकडून कर्णधारपदाची तयारी सुरू
बेली यांनी सांगितलं की, 'जर कमिन्स खेळला नाही, तर स्मिथ संघाचे नेतृत्व करेल. हे आधीच आमच्यासाठी प्रभावी रणनीती ठरले आहे. कमिन्स संघासोबत राहणार आहे, पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी होईल आणि गोलंदाजीसाठी तयारी करेल.' तथापी, स्मिथने न्यू साउथ वेल्समध्ये परतल्यानंतर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. आगामी शेफील्ड शिल्ड सामन्यांमध्ये तो न्यू साउथ वेल्ससाठी खेळेल, ज्यामुळे त्याची फॉर्म आणि तयारी अॅशेसपूर्वी सुनिश्चित होईल.
हेही वाचा - Pakistan vs Afghanistan : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 6 ठार; रशीद खान संतापला, तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय!
कॅमेरॉन ग्रीन देखील दुखापतीमुळे बाहेर
कमिन्ससोबतच अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनही पाठीच्या शस्त्रक्रियेतून बरा होत आहे. हॅमस्ट्रिंगच्या किरकोळ ताणामुळे तो भारताविरुद्धच्या आगामी मालिकेतून बाहेर राहणार आहे. बेलीने सांगितले की, अशा दुखापतींमुळे खेळाडू चार ते सहा आठवडे मैदानावरून दूर राहू शकतात, परंतु अॅशेसपूर्वी ग्रीन पूर्णपणे फिट असेल याची खात्री आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्या स्टार खेळाडूंविना सामन्यांसाठी रणनीती आखावी लागेल, परंतु स्मिथच्या नेतृत्वाखाली संघ सक्षम राहण्याची अपेक्षा आहे.