WPL 2026 Auction : अमेलिया केरला मागे टाकत यूपी वॉरियर्सची ‘ही’ खेळाडू ठरली WPL 2026 मधील सर्वात महागडी खेळाडू

महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात एकूण 67 खेळाडूंचा लिलाव झाला असून यात दोन खेळाडू महागड्या ठरल्या आहेत. यूपी वॉरियर्सकडे सर्वात महागडे खेळाडू खरेदी केले आहे.

WPL 2026 Auction : अमेलिया केरला मागे टाकत यूपी वॉरियर्सची ‘ही’ खेळाडू ठरली WPL 2026 मधील सर्वात महागडी खेळाडू

महिला प्रीमियर लीगचा 2026 हंगाम 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहे. महिला प्रीमियर लीगचे आधीच 3 हंगाम झाले आहेत आणि चौथ्या हंगामाचा लिलाव दिल्लीमध्ये पार पडल. हा आगामी हंगाम दोन क्रिकेट मैदानांवर खेळवला जाणार आहे. WPL 2026 चा पहिला सामना नवी मुंबई क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, तर अंतिम सामना बडोदा क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. ही माहिती महिला प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एक्स वर देण्यात आली आहे.

या लिलावात एकूण 67 खेळाडूंचा लिलाव झाला असून यात दोन खेळाडू महागड्या ठरल्या आहेत. यूपी वॉरियर्सकडे सर्वात महागडे खेळाडू खरेदी केले आहे. यावेळी दीप्ती शर्मा हिला यूपी वॉरियर्सने आरटीएम वापरून 3.2 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यामुळे ती या महिला प्रीमियर लीगच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा- WPL 2026 Auction: मुंबई इंडियन्सकडून ‘या’ खेळाडूची 6 पट किमतीत खरेदी; ‘इतक्या’ रुपयांत झाला लिलाव

यूपी वॉरियर्सने पाच खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केले. यापुर्वी महिला प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने सर्वात मोठा निर्णय घेत न्यूझीलंडची स्टार ऑलराऊंडर अमेलिया केरला तब्बल 3 कोटींना खरेदी केले. तिची मूळ किंमत 50 लाख होती. म्हणजेच केरला सहापट मोठी बोली मिळाली. मुंबईने पुन्हा एकदा तिच्यावर मोठा विश्वास दाखवत तिला संघात परत घेतले. तर तिच्या वरचढ दीप्ती शर्मा ठरली आहे. यावेळी या लिलावात 23 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. या लिलावात 67 खेळाडूंवर एकूण 40.8 कोटी रुपये खर्च झाले. 

हेही वाचा- WPL 2026 Schedule: महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सामने

2026 च्या वर्ल्ड प्रीमियर लीग लिलावातील 5 सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये यूपी वॉरियर्स संघातील दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मेग लॅनिंग यांच्या नावासह मुंबई इंडियन्समधील अमेलिया केर आणि जीजीमध्ये सोफी डेव्हाईन यांच्या नावांचा समावेश झाला आहे. यावेळी दीप्ती शर्मा 3.5 कोटी, शिखा पांडे 2.4 कोटी, मेग लॅनिंग 1.9 कोटी, अमेलिया केर 3 कोटी, सोफी डेव्हाईन 2 कोटी या रक्कमेसह संघात सामील करून घेण्यात आलं आहे. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number