Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार; ‘या’ कारणामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये अवघ्या 80 चेंडूत 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची झंझावाती खेळी केली होती.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार; ‘या’ कारणामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

Vaibhav Suryavanshi : भारताचा उदयोन्मुख स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी आता क्रिकेटच्या मैदानापासून काही दिवस लांब राहणार आहे. नुकतेच बॅटने धावांचा पाऊस पाडणाऱ्या वैभवच्या हातात आता कागद आणि पेन असेल. अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावल्यानंतर, वैभव आता 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 10 वीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहे. क्रिकेटमधील यशानंतर आता शैक्षणिक आयुष्यातील या महत्त्वाच्या परीक्षेमुळे वैभवची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

CBSE कडून प्रवेशपत्र जारी; व्यस्त वेळापत्रकात अभ्यासाचे आव्हान
वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर परिसरातील एका खासगी शाळेचा विद्यार्थी आहे. CBSE बोर्डाने त्याचे प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले असून त्याचे परीक्षा केंद्र 'पोद्दार इंटरनॅशनल स्कूल' येथे आहे. आंतरराष्ट्रीय दौरे आणि व्यस्त क्रिकेट वेळापत्रकामुळे अभ्यासासाठी वेळ काढणे हे वैभवसाठी मोठे आव्हान होते. मात्र, आता या परीक्षेसाठी तो सज्ज झाला असून, परीक्षेच्या कालावधीत तो क्रिकेटच्या मैदानापासून पूर्णपणे दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे.

कडेकोट सुरक्षेत होणार परीक्षा
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक नील किशोर सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे की, वैभव जरी स्टार क्रिकेटपटू असला तरी त्याला इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच सामान्य वागणूक दिली जाईल. त्याला कोणतीही विशेष VIP सोय पुरवली जाणार नाही. मात्र, त्याच्या लोकप्रियतेमुळे परीक्षा केंद्रावर सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून संपूर्ण केंद्राची तपासणी करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही व्यत्ययाशिवाय परीक्षा पार पडेल.

हेही वाचा – Harbhajan Singh Advice: चार सामन्यात 11 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा 'हा' गोलंदाज भारतासाठी ठरणार व्हिलन? भज्जी पाजीने सांगितला बचावाचा मार्ग

विश्वचषकातील 'धडाका' आणि आयपीएलची तयारी
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये अवघ्या 80 चेंडूत 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची झंझावाती खेळी केली होती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर तो भविष्यातील 'सुपरस्टार' म्हणून ओळखला जात आहे. बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर वैभव पुन्हा एकदा मैदानात परतणार असून, तो IPL 2026 ची तयारी सुरू करेल. वैभव सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा भाग असून, आयपीएलमध्येही त्याच्याकडून अशाच स्फोटक कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number