किंग कोहलीचा शतकी धमाका! सचिनचा जागतिक विक्रम मोडत रचला नवा इतिहास; भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

किंग कोहलीचा शतकी धमाका! सचिनचा जागतिक विक्रम मोडत रचला नवा इतिहास; भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
History Repeat, One More Record Defeat

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने 50 षटकांत 295/7 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला आले. दोघांमध्ये 12 षटकांत 74 धावांची भागीदारी झाली. रोहित 35 चेंडूत 32 धावा करून बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला आला.

सर्वात जलद 15,000 धावांचा विक्रम
विराटने 315 व्या वनडे सामन्याच्या 302 व्या डावात हा टप्पा गाठला, तर सचिनला 15,000 धावा पूर्ण करण्यासाठी 387 सामने आणि 377 डाव लागले होते. त्यामुळे वनडेत सर्वात जलद 15,000 धावा करण्याचा विश्वविक्रम आता विराटच्या नावावर जमा झाला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार करणारा तो सचिननंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला.

विराट आता भारतात सर्वाधिक वनडे धावांचा सचिनचा आणखी एक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. सचिनच्या नावावर भारतात 6,976 धावा आहेत, तर विराटने आतापर्यंत 6,867 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी त्याला आता फक्त 110 धावांची गरज आहे.

विराटने भारतात 130 सामन्यांच्या 127 डावांमध्ये 62.42 च्या सरासरीने 6,867 धावा केल्या असून, यात 27 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.

IND vs WI 1st ODI : सात वर्ष क्रिकेटपासून लांब, पण एका संधीने बदललं सगळं! गिलने विश्वास दाखवला अन् मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मिळाली मोठी संधी

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number