‘5 कोटींचा दावा…’; प्रेमानंद महाराज आश्रम वादावर विराट कोहलीचं स्पष्टीकरण

विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात येण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी दावा श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष फलाहारी महाराज (दिनेश शर्मा) यांनी केला होता.
‘5 कोटींचा दावा…’; प्रेमानंद महाराज आश्रम वादावर विराट कोहलीचं स्पष्टीकरण
Virat Kohli, Premanand Maharaj

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात येण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी दावा श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष फलाहारी महाराज (दिनेश शर्मा) यांनी केला होता. या दाव्यामुळे क्रीडा आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर विराट कोहलीच्या अधिकृत प्रवक्त्याने जाहीर पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. फलाहारी महाराजांनी केलेले सर्व दावे पूर्णपणे असत्य, निराधार आणि वस्तुस्थितीशी कोणताच संबंध नसलेले आहेत, असे सांगत कोहलीच्या टीमने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.

“केवळ अगाध श्रद्धा आणि आदरापोटीच भेट;” प्रवक्त्याकडून स्पष्टीकरण

विराट कोहलीच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मनात प्रेमानंद महाराजांबद्दल अत्यंत अगाध श्रद्धा आणि आदर आहे. केवळ याच आध्यात्मिक भावनेपोटी ते वेळोवेळी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात जात असतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा पैसे घेतल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. विराट आणि अनुष्का यांनी आतापर्यंत सुमारे 8 वेळा प्रेमानंद महाराजांच्या केलिकुंज आश्रमात जाऊन दर्शन घेतलेले आहे.

हेही वाचा – IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाभोवती वादांचे सावट

रसिक दुलारी यांच्या मृत्यूनंतर प्रेमानंद महाराजांच्या आश्रमावर गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. आश्रमात पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण (मनी लाँड्रिंग) आणि तेथून काही तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या वादंगामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने प्रेमानंद महाराजांना त्यांच्या ‘हित राधा केली कुंज’ या निवासावरून दुसऱ्या एका अज्ञात व गुप्त आश्रमात हलवले आहे. या घडामोडींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि भक्तांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, धर्माच्या नावाखाली गैरप्रकार होत आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version