Virat Kohli Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीची एन्ट्री, मिळणार ‘इतका’ मोबदला…

24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आता विराट कोहलीची बॅट चमकताना पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीनं या ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली

Virat Kohli Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीची एन्ट्री, मिळणार ‘इतका’ मोबदला…

24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आता विराट कोहलीची बॅट चमकताना पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीनं या ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली आहे. त्यामुळे विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे.

दरम्यान प्रत्येक सामन्यांसाठी तो किती मानधान घेणार असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमधील प्रत्येक सामन्यांसाठी 60000 रुपये कमवू शकतो. जर विराट कोहलीने तीन सामने खेळले तर तो 1,80,000 रुपये कमवू शकतो. 

हेही वाचा- Rohit Sharma T20 Comeback: रोहित शर्मा पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटच्या मैदानात उतरणार; BCCI ला दिला खास संदेश

दरम्यान विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळणार आहे. 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश, 26 डिसेंबर रोजी गुजरात आणि 29 डिसेंबर रोजी सौराष्ट्र यांच्याशी सामना करतील. यानंतर, दिल्लीचा सामना 31 डिसेंबर रोजी ओडिशाशी होईल. 3 जानेवारी रोजी दिल्ली सर्व्हिसेसविरुद्ध खेळेल, तर 6 जानेवारी रोजी त्यांचा सामना रेल्वेशी होईल.

8 जानेवारी रोजी अंतिम सामन्यात दिल्लीचा सामना हरियाणाशी होईल. विराट कोहलीने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतो, जिथे तो प्रत्येक सामन्यासाठी 6 लाख कमवतो.

हेही वाचा- IND vs SA 2nd Odi: ते मला नेहमी..” दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका सुरू असताना खेळाडूने गौतम गंभीरबाबत केला मोठा खुलासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number