भारत-पाक युद्धबंदीनंतर IPL 2025 कधी सुरु होणार? मोठी अपडेट आली समोर

येत्या काही दिवसांत भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास, लवकरच आयपीएल सामने पुन्हा सुरू होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते.

भारत-पाक युद्धबंदीनंतर IPL 2025 कधी सुरु होणार? मोठी अपडेट आली समोर
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीनंतर, आयपीएल 2025 बाबत एक मोठी अपडेट आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही दिवसांत भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास, लवकरच आयपीएल सामने पुन्हा सुरू होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते. तेव्हापासून, चाहते आता आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

IPL 2025 बाबत BCCI ची बैठक – 

दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल, बीसीसीआयचे अधिकारी आणि अधिकारी 11 मे रोजी सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भेटतील. त्या बैठकीत सर्व अधिकारी स्पर्धेच्या वेळापत्रकाचा आढावा घेतील आणि ते पूर्ण करण्याचा सर्वोत्तम आणि शक्य मार्ग ठरवतील. या बैठकीत उर्वरित सामने कोणत्या मैदानांवर खेळवायचे हे ठरवले जाईल. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. 

हेही वाचा – IPl 2025 स्थगित, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

आयपीएल 2025 पुन्हा सुरू झाल्यास त्याचे उर्वरित सामने मर्यादित ठिकाणी खेळवले जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ते 3 किंवा 4 शहरांपुरते मर्यादित असू शकतात. जेणेकरून प्रवास कमी होईल आणि काही डबल हेडर ठेवून, ही स्पर्धा मे महिन्याच्या अखेरीस कशीतरी पूर्ण होऊ शकते.

हेही वाचा – रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

IPL चे उर्वरित सामने 3 ठिकाणी होऊ शकतात – 

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल थांबवण्यात आले आहे. ते अद्याप रद्द झालेले नाही, परंतु ते पुढे ढकलण्यात आले आहे. जर आयपीएलचे उर्वरित सामने मे महिन्यात झाले तर बीसीसीआयने त्यासाठी तीन ठिकाणे निवडली आहेत. क्रिकइन्फोच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आयपीएलचे उर्वरित सामने बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये होऊ शकतात. आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी प्रथम सरकारकडून परवानगी घेतली जाईल, त्यानंतरच पुढील तयारी केली जाईल. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number