IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचा थरार 29 ऑक्टोबरपासून कॅनबेरा येथे सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेकडे लागले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज असून, पहिल्या सामन्यासाठीचा अंतिम संघ कोणता असेल याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सलामीची जबाबदारी गिल आणि अभिषेककडे
टीम इंडियाच्या सलामी जोडीबाबत संभ्रम नसून शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोघे डावाची सुरुवात करतील, अशी शक्यता जवळपास निश्चित आहे. या जोडीने अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून, त्यांच्याकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे.
सूर्यकुमार आणि तिलक
तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव, तर चौथ्या स्थानी तिलक वर्मा फलंदाजी करतील. दोघेही वेगवान धावगतीने खेळण्याची क्षमता ठेवतात आणि संघाला मधल्या फळीत स्थैर्य देऊ शकतात.
हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवम दुबेची ‘एंट्री’
दुखापतीमुळे हार्दिक पंड्या मालिकेबाहेर असल्याने त्याची जागा शिवम दुबे घेणार आहे. तथापी, विकेटकीपरच्या भूमिकेसाठी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यात चुरस आहे.
कुलदीपबाबत सस्पेन्स कायम
फिरकी विभागात सर्वांची नजर कुलदीप यादवकडे आहे. तो विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे निश्चित पर्याय वाटतो, पण अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची ऑलराउंड क्षमता संघात संतुलन राखते. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते दोन स्पिनर उतरतील, यावर सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा - Ziva Dhoni : वडिलांसारखं क्रिकेटर नाही, तर... महेंद्रसिंह धोनीच्या लेकीला 'या' क्षेत्रात करायचंय करिअर
बुमराह-अर्शदीपची जोडी वेगवान गोलंदाजीला सज्ज
वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे मुख्य दिग्गज असतील. त्यांच्या सोबत वरुण चक्रवर्तीला संधी मिळू शकते. खेळपट्टी आणि हवामानानुसार, अंतिम निर्णय सामना सुरू होण्यापूर्वीच घेण्यात येईल.
हेही वाचा - Rohini Kalam Death: आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणी कलम घरात मृत अवस्थेत; चौकशी सुरू, क्रीडा क्षेत्रात शोककळा
भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव