Monday, May 11, 2026 11:59:20 AM

IPL 2026 CSK : धोनीचा लाडका 19 व्या मोसमाला मुकणार; चेन्नईची चिंता वाढली; दुखापतीमुळे मॅचविनर बॅट्समॅनची IPL मधून एक्झिट

गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या चेन्नईसाठी हा मोलाचा खेळाडू मुकणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

 ipl 2026 csk  धोनीचा लाडका 19 व्या मोसमाला मुकणार चेन्नईची चिंता वाढली दुखापतीमुळे मॅचविनर बॅट्समॅनची ipl मधून एक्झिट

Ayush Mhatre Injury: आयपीएल 2026 च्या हंगामात आधीच संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अडचणींत मोठी भर पडली आहे. संघाचा सलामीवीर आणि मराठमोळा युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या चेन्नईसाठी हा मोलाचा खेळाडू मुकणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

दुखापतीचे नेमकं कारण काय?
18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात फलंदाजी करताना आयुषच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. वैद्यकीय तपासणीनंतर चेन्नई फ्रँचायझीने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, आयुषला पूर्णपणे फिट होण्यासाठी किमान 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. या प्रदीर्घ रिकव्हरी कालावधीमुळे तो उर्वरित हंगामात खेळू शकणार नाही.

चेन्नईचा 'रन मशीन' म्हात्रे
या हंगामात चेन्नईची फलंदाजी ढेपाळलेली असताना आयुष म्हात्रे हा संघासाठी एकमेव आशेचा किरण ठरला होता. त्याने 6 सामन्यांत 177.87 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने 201 धावा कुटल्या होत्या. सध्या तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ संजू सॅमसन 192 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. म्हात्रेच्या अनपेक्षित एक्झिटमुळे आता सलामीच्या जोडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - Mumbai Indians | तिलक वर्माच्या आधी 'या' खेळाडूंनी मारलं मुंबईसाठी शतक; जाणून घ्या सचिन, रोहित यांच्यासह आणखी कोणाचा यादीत समावेश

प्लेऑफचे कठीण समीकरण
चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले असून 4 सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. सध्या संघाच्या खात्यात केवळ 4 गुण आहेत. सुरक्षितरीत्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला किमान 16 गुणांची गरज असते. चेन्नईचे आता 8 सामने शिल्लक असून, 16 गुणांचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना उर्वरित 8 पैकी 6 सामने जिंकणे अनिवार्य आहे. जर संघाने 8 पैकी 7 सामने जिंकले, तर त्यांचे 18 गुण होतील आणि टॉप-4 मधील स्थान निश्चित होईल. मात्र, फॉर्मात असलेल्या सलामीवीराविना हा डोंगर सर करणे ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनीसाठी मोठे आव्हान असेल.
 


सम्बन्धित सामग्री