Ishan Kishan Wedding : इशान किशन बोहल्यावर चढणार ?; आजोबांनी लग्नाबाबत केला मोठा खुलासा

इशान किशन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा असून, खुद्द त्याच्या आजोबांनीच यावर शिक्कामोर्तब केले आहे.<br/>

Ishan Kishan Wedding : इशान किशन बोहल्यावर चढणार ?; आजोबांनी लग्नाबाबत केला मोठा खुलासा

Ishan Kishan Wedding : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन सध्या मैदानावर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत आहे. एकीकडे पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्याची तयारी सुरू असताना, दुसरीकडे इशानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. इशान किशन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा असून, खुद्द त्याच्या आजोबांनीच यावर शिक्कामोर्तब केले आहे.

कोण होणार इशानची 'लाईफ पार्टनर'?
इशान किशनच्या लग्नाबाबत त्याचे आजोबा अनुराग पांडे यांनी एका मुलाखतीत महत्त्वाची माहिती दिली. इशानच्या पसंतीला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इशानची मैत्रीण अदिती हुंडिया हिच्याशी त्याचे नाव जोडले जात असून, आजोबांच्या वक्तव्याने या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.

आजोबा काय म्हणाले?
'इशान ज्या मुलीची निवड करेल, तिला आम्ही आनंदाने स्वीकारू. लोक काय म्हणतात याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमच्या मुलांचा आनंद कशात आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. इशानच्या मोठ्या भावाने पल्लवीशी लग्न केले, ते आम्ही स्वीकारले; तसेच इशानच्या बाबतीतही आमचा निर्णय तोच असेल,' असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल' आदिती हुंडिया?
इशान किशनच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती ग्लॅमर जगतातील एक ओळखीचा चेहरा आहे. आदिती हुंडिया एक यशस्वी मॉडेल असून तिने 'मिस इंडिया' स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. तसेच तिने 'मिस दिवा 2018' चा किताबही जिंकला आहे. 2019 च्या आयपीएल फायनलमध्ये आदिती पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद झाली होती. तेव्हापासून तिला 'मिस्ट्री फॅन गर्ल' म्हणून ओळखले जाऊ लागले. आदिती सोशल मीडिया स्टार असून जाहिराती आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून ती कोट्यवधींची कमाई करते. तिची एकूण संपत्ती (Net Worth) सुमारे 12 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

वर्ल्डकप विजयानंतर सनई चौघडे वाजणार?
सध्या इशानचे संपूर्ण लक्ष आगामी स्पर्धा आणि वर्ल्डकप जिंकण्यावर आहे. मात्र, आजोबांनी दिलेल्या या 'ग्रीन सिग्नल'मुळे इशान आणि आदितीच्या नात्यावर आता अधिकृत मोहोर उमटण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करणाऱ्या या जोडीच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number