IND vs PAK: T-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया हस्तांदोलन करणार का? कर्णधार हरमनप्रीतने दिलं उत्तर

या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडू पाकिस्तानी संघाशी मैदानावर हस्तांदोलन करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे

IND vs PAK: T-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया हस्तांदोलन करणार का? कर्णधार हरमनप्रीतने दिलं उत्तर

IND vs PAK: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाची 10 वी आवृत्ती मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. या भव्य स्पर्धेत भारतीय संघ 'ग्रुप ए' (Group A) मध्ये असून, त्यांचा सलामीचा सामना आज पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबॅस्टन मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडू पाकिस्तानी संघाशी मैदानावर हस्तांदोलन करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले असून, संघ केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले आहे.

'हस्तांदोलन न करण्याचे' धोरण आणि हरमनप्रीतची भूमिका
यापूर्वी रायझिंग स्टार्स आशिया कप, Under-19 आशिया कप आणि Under-19 विश्वचषकादरम्यान भारतीय पुरुष व महिला संघांनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत 'हस्तांदोलन न करण्याचे' धोरण अवलंबल्याचे पाहायला मिळाले होते. अगदी कोलंबो येथे झालेल्या वनडे विश्वचषकातील सामन्यातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते. आगामी सामन्यात काय होणार, याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरमनप्रीत कौर म्हणाली, "आम्ही येथे केवळ क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत आणि आमचे पूर्ण लक्ष त्याच एका उद्दिष्टावर केंद्रित आहे. आम्ही इतर कोणत्याही विषयावर बोलत नाही."

हेही वाचा – Cricketer Assault: 'या' राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण; तीव्र संतापानंतर 3 पोलिस अधिकारी निलंबित

आकडेवारीत टीम इंडियाचे पारडे अत्यंत जड
हरमनप्रीत कौरच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ या विश्वचषकाची सुरुवात दणदणीत विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आतापर्यंतच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 'हेड-टू-हेड' आकडेवारीवर नजर टाकली, तर टीम इंडियाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 16 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी 13 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ 3 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. तसेच, टी-20 विश्वचषकाचा विचार केला तर दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत; यातील 6 सामने भारताने एकतर्फी जिंकले असून पाकिस्तानला केवळ 2 सामन्यांमध्येच यश आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number