IND W vs AUS W 3rd T20I: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करत जिंकली टी-20 मालिका

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावांचा डोंगर उभा केला.

IND W vs AUS W 3rd T20I: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करत जिंकली टी-20 मालिका

IND W vs AUS W 3rd T20I: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात केली असून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावांचा डोंगर उभा केला. या विजयासह भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियन भूमीवर आपला दबदबा निर्माण केला आहे.

स्मृती-जेमिमाची शानदार फलंदाजी
भारतीय डावाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची फलंदाजी. स्मृती मानधना हिने 55 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावांची स्फोटक खेळी केली. तिला जेमिमा रॉड्रिग्जने उत्तम साथ दिली; जेमिमाने 46 चेंडूत 59 धावा फटकावल्या. रिचा घोष हिने देखील मोक्याच्या वेळी 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने 2 विकेट घेतल्या, तर सोफी मोलिनेक्स आणि किम गार्थ यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

हेही वाचा – IND vs SA Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका उद्या भिडणार; कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: दोन्ही संघांचे खेळाडू 

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, श्रेयंका पाटील, वैष्णवी शर्मा, भारती फुलमाळी, गुणालन कमलिनी, स्नेह राणा.

ऑस्ट्रेलिया महिला संघ: बेथ मूनी (यष्टीरक्षक), जॉर्जिया वोल, फोबे लिचफिल्ड, एलिस पेरी, अ‍ॅशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, निकोला केरी, अ‍ॅनाबेल सदरलँड, सोफी मोलिनेक्स (कर्णधार), किम गार्थ, डार्सी ब्राउन, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, मेगन शट.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number