क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. अखेर गुरुवारी 20 मार्च 2025 रोजी दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले. यापूर्वी दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जेव्हा क्रिकेटर युजवेंद्र चहल वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात येताच त्याच्या अनोख्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे नेमकं चहलच्या टी-शर्टवर काय लिहिले होते? चला तर जाणून घेऊया.
चहलच्या नव्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधले:
गुरुवारी, क्रिकेटर यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा तोंडावर मास्क घालून कोर्टात पोहोचले. कोर्टात येताना चहलने एक जॅकेट घातला होता. त्यासोबत, त्याने त्याचे डोकेही झाकले होते. मात्र, कोर्टातून बाहेर येताच क्रिकेटर यजुवेंद्र चहलने जॅकेट काढले. बाहेर येताच चहलच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधले. काळ्या रंगा त्याच्या टी-शर्टवर Be Your Own Sugar Daddy (स्वतःचे शुगर डॅडी व्हा) असे लिहिले होते. मुंबई उच्च न्यायालयातून बाहेर पडताच, पापाराझीने युझवेंद्रकडून प्रतिक्रिया मागितली. मात्र, युझवेंद्र चहलने काहीच उत्तर दिले नाही. त्याच्या टी-शर्टवरील शब्द सर्वकाही सांगत होते. नेटकरांच्या मते, हा टी-शर्ट धनश्री वर्मासाठी असावा. गेली अडीच वर्षे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. धनश्रीच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर येताच, अनेक महिन्यांपासून धनश्रीला ऑनलाइन ट्रोल केले जात आहे.
काय होता टी-शर्टमागील संदेश?
क्रिकेटर यजुवेंद्र चहलच्या टी-शर्टवर Be Your Own Sugar Daddy (स्वतःचे शुगर डॅडी व्हा) असे लिहिले होते. याचा अर्थ असा आहे की, 'तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवा आणि स्वतःच्या खर्चासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. चहलचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटीझन या संदेशला धनश्रीसोबत जोडत आहे. तर काहीजण म्हणतात, 'या टी-शर्टच्या माध्यमातून चहलने धनश्रीवर टीका केली आहे.
'शुगर डॅडी' म्हणजे नेमकं काय?
'शुगर डॅडी' हा शब्द अशा महिलांसाठी वापरल्या जातात, ज्या आर्थिक कारणांसाठी अशा पुरुषांवर अवलंबून असतात, जे आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात. हे नाते इतर नात्यांपेक्षा वेगळे आहे कारण त्यात पैशाला अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे, नेटिझन्सच्या मते, 'हा संदेश धनश्री वर्मासाठी असावा' , असे बोलले जात आहे.