बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुणे निवडणुकीच्या रिंगणात; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी घेतला मोठा निर्णय

Pune Graduate and Teachers Elections : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता नवी रंगत पाहायला मिळत आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुणे निवडणुकीच्या रिंगणात; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी घेतला मोठा निर्णय
Abhijeet Bichukale

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता चुरस वाढलेली दिसत आहे. या निवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही आता उडी घेतली असून चर्चांना उधाण आले आहे. अभिजीत बिचुकले यांनी शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

निवडणूक लवढण्यावर ते आता ठाम असून जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. मी निवडणुकीत उभा राहिलो की इतर उमेदवारांना प्रसिद्दी मिळते, माझ्यामुळे ही निवडणूक गाजणार आहे”, असे वक्तव्य करत बिचुकले यांनी पुन्हा एकदा आपल्या हटके शैली लक्ष वेधून घेतलेले आहे. सध्या पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी बऱ्याच दिग्गजांनी अर्ज भरले आहे तर बिचुकले यांच्या एन्ट्रीमुळे या निवडणुकीत मनोरंजनाचा तडका लागला गेला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number