Divya Shinde Arrest: डॉक्टरांना मारहाण, 5 लाखांची खंडणी! बिग बॉस फेम दिव्या शिंदेविरोधात मोठी कारवाई

बिग बॉस 2025 फेम इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेवर डॉक्टरांना मारहाण आणि खंडणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हणतात, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. अशाच गंभीर आणि गुन्हेगारी वर्तणुकीमुळे तिला बिग बॉसच्या सीझनमधून बाहेर काढण्यात आले होते, कारण तिने सहस्पर्धकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.तिचे हे वर्तन आता अधिकच वाढले असून, अखेर तिला अटक करण्यात आली आहे. […]

Divya Shinde Arrest: डॉक्टरांना मारहाण, 5 लाखांची खंडणी! बिग बॉस फेम दिव्या शिंदेविरोधात मोठी कारवाई

बिग बॉस 2025 फेम इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेवर डॉक्टरांना मारहाण आणि खंडणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हणतात, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. अशाच गंभीर आणि गुन्हेगारी वर्तणुकीमुळे तिला बिग बॉसच्या सीझनमधून बाहेर काढण्यात आले होते, कारण तिने सहस्पर्धकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.तिचे हे वर्तन आता अधिकच वाढले असून, अखेर तिला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या नावाखाली दिव्या शिंदे आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने ज्येष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करून 5 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे काळेपडळ पोलिसांनी खंडणी आणि मारहाणीशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Divya Shinde: निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून 5 लाखांची मागणी अन् मारहाण! दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; पुण्यात खळबळ

पोलिसांनी कारवाई करत दिव्या शिंदेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर व्यक्तींची भूमिका याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, दिव्या शिंदेला ‘बिग बॉस मराठी 6’मधून फेब्रुवारी 2026 मध्ये बाहेर करण्यात आले होते. त्यावेळी सहस्पर्धकांना धमकी दिल्याच्या वादाचा उल्लेख वृत्तांत करण्यात आला होता.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number