निष्काळजीपणा जीवावर बेतला! रायफलची साफसफाई करताना चुकून गोळी सुटली; माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

लोणावळ्यात घरात रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

निष्काळजीपणा जीवावर बेतला! रायफलची साफसफाई करताना चुकून गोळी सुटली; माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
rifle accidentally

लोणावळा : लोणावळ्यात घरात रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभय मराठे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरातील रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती त्यांच्या छातीला लागली. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रायफलमध्ये गोळी नेमकी कशी लोड होती आणि साफसफाईदरम्यान गोळी कोणत्या परिस्थितीत सुटली, याचा पोलीस तपास सुरू आहे. या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : बुलढाण्यात रक्तरंजित थरार! शिंदेसेनेत आणि अजित पवार गटात तुंबळ हाणामारी; दोघांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, मराठे रायफल साफ करत असताना ती अचानक चालली. गोळी थेट छातीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर लोणावळा शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. रायफलमध्ये गोळी कशी भरली गेली होती आणि साफसफाईच्या प्रक्रियेदरम्यान ती नेमकी कोणत्या परिस्थितीत चालली, याची पोलीस तपासणी करत आहेत. ही घटना अपघाती मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number