गुजरातच्या सुरेंद्रनगरमधून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे. पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहत असलेल्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अक्षरश:नरकयातना भोगाव्या लागलेल्या आहेत. या घडलेल्या संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.
घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही तिच्या पतीपासून वेगळी होऊन प्रियकरासोबत वास्तव्यास होती. या गोष्टीचा राग मनात धरत पतीने आपल्याच नातेवाईकांसह दोघांचा शोध घेतला. त्यानंतर दोघे मिळताच त्यांना जबरदस्तीने पकडत निर्जन ठिकाणी नेले आणि शुद्दीकरणच्या नावाखाली चक्क अमानुष मारहाण केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी या तरुणाला बांधून काठ्यांनी बेदम मारहाण ही केली.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर जमलेल्या सर्व जमावासमोरच महिलेसोबत जबरदस्तीने अश्लील कृत्य करण्यासही त्याला भाग पाडले गेले. या अमामुष प्रकाराचा व्हिडिओ काढत आरोपींनी तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोसिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. त्यानंतर सुरेंद्रनगर पोलिसांनी तातडीने पथके तयार करत शोधमोहीम ही सुरु केली.
अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी पीडित महिलेला ताब्यात घेत तिचे योग्य समुपदेशन केले, त्यानंतर तिने सर्व घडलेला थरार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत पीडितेचा पती आणि त्याच्या तब्बल 8 नातेवाईकांना अशा एकूण 9 जणांना अटक केली.