कोकण रेल्वे २७ तासांनंतर सुरू

सुमारे २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू झाली तरी सध्या गाड्यांचा वेग कमी आहे.

कोकण रेल्वे २७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : सुमारे २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू झाली तरी सध्या गाड्यांचा वेग कमी आहे. पुढील काही तासांत टप्प्याटप्प्याने गाड्यांचा वेग वाढवला जाईल. याआधी मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली. रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाने दरड हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. रेल्वे सेवा ठप्प असताना रेल्वे प्रशासनाने एसटी महामंडळाशी समन्वय साधून विसेष बस सोडण्याची व्यवस्था केली होती. या बसद्वारे प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न सुरू होता. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number