चिमुकलीचे शब्द ऐकून शेजारीही हादरले! ते मला चटके देतात अन्…; डॉक्टर दाम्पत्याचा संतापजनक कारनामा

Crime News : मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ 7 वर्षांच्या एका अनाथ मुलाली घरकामासाठी ठेवून तिचा अमानुष छळ केल्याचा आरोप आहे.

चिमुकलीचे शब्द ऐकून शेजारीही हादरले! ते मला चटके देतात अन्…; डॉक्टर दाम्पत्याचा संतापजनक कारनामा
दिवसभर काम, चूक झाली की गरम चिमट्याचे चटके

मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ 7 वर्षांच्या एका अनाथ मुलाली घरकामासाठी ठेवून तिचा अमानुष छळ केल्याचा आरोप हा एका डॉक्टर दाम्पत्यावर लागलेला आहे. या चिमुकलीला मारहाण करत गरम चिमट्याने चटके देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

देवासारख्या डॉक्टरकडूनच हैवानियत
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील आहे. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शहडोलमध्ये कार्यरत असलेले हे डॉक्टर दाम्पत्य तिला बांदा येथून आपल्यासोबत घेऊन आलेले होते. तेव्हापासून ती या दाम्पत्यांच्या घरी राहत होती. चिमुकलीचा आरोप आहे की, तिच्याकडून दिवसभर हे घरातील झाडू-भांडी घासणे यांसारखी कामे करुन घेत होती.

हेही वाचा-17 वर्षीय मुलाची लिंगबदलाची इच्छा; विरोध होताच आईसोबतचं केलं भयंकर कृत्य

चिमुकलीचे शब्द ऐकून शेजारीही हादरले
जर दिवसभर करत असलेल्या कामात जराही चूक झाली किंवा तिने ते काम करण्यास नकार दिला, तर तिला ते बेदम मारहाण करत असत. डॉक्टरच्या पत्नीवर चिमुकलीला गरम चिमट्याने चटके दिल्याचा गंभीर आरोप आहे. या अमानुष छळाला कंटाळून बुधवारी चिमुकलीने संधी साधत डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून पळ काढला.

ती थेट शेजाऱ्यांचा घरी गेली आणि रडत-रजत सर्व प्रकार सांगितला. चिमुकल्याच्या अंगावर असलेल्या जखमा पाहून शेजाऱ्यांनी तातडीने सर्व माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर घटनास्थळी जात पोलिसांनी चिमुकलीला ताब्यात घेतले आणि तिच्या अंगावरील मारहाणीच्या आणि चटका दिलेल्या खुणा पाहिल्या. पोलिसांना सर्व प्रकार आढळून येताच त्यांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.

हेही वाचा-हृदयद्रावक! 7 वर्षीय मुलाचा खोडकरपणा अन् पत्नीने…; अखेर वडिलांनी घरातचं संपवलं जीवन

धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्या रुग्णालयात तिची तपासणी केली, त्यात रुग्णालयात आरोपी महिला डॉक्टरचे पती कार्यरत आहे. या प्रकरणाची माहिती बाल कल्याण समितीला कळताच त्यांनी तातडीने लक्ष घातले असून चिमुकलीच्या सुरक्षेसाठी प्रक्रिया सुरु केली आहेय पोलीस सध्या वैद्यकीय अहवाल, मुलीचा जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number