Maharashtra Drought 2026: राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, Trigger-1 दुष्काळ म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते?

राज्यातील बळीराजासाठी आज मोठी बातमी समोर आली. अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. म्हणजेच तब्बल 75 टक्के महाराष्ट्र आता अधिकृतपणे दुष्काळाच्या छायेत आला आहे. मान्सूनने दगा दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणेनंतर आता सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांना वेग येणार आहे. काय आहे हा Trigger-1 […]

Maharashtra Drought 2026: राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, Trigger-1 दुष्काळ म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते?
Drought Benefits Farmers

राज्यातील बळीराजासाठी आज मोठी बातमी समोर आली. अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. म्हणजेच तब्बल 75 टक्के महाराष्ट्र आता अधिकृतपणे दुष्काळाच्या छायेत आला आहे. मान्सूनने दगा दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणेनंतर आता सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांना वेग येणार आहे.

काय आहे हा Trigger-1 दुष्काळ?
सरकारने हा दुष्काळ ‘ट्रिगर-1’ (Trigger-1 Drought) निकषानुसार जाहीर केला आहे.सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या तालुक्यांमध्ये मान्सून काळात 75% पेक्षा कमी पाऊस झाला आहे किंवा पावसात मोठा खंड पडला आहे, अशा तालुक्यांना पहिल्या टप्प्यात धोक्याची घंटा म्हणून ट्रिगर-1 लावला जातो. हा पूर्ण दुष्काळ नसला तरी, दुष्काळाच्या दिशेने पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जाते.मुख्यमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने शेतात जाऊन पीक पंचनामे पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना काय-काय मिळणार? (ट्रिगर-1 चे फायदे)
एकदा तालुका ट्रिगर-1 मध्ये आला की, प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करावे लागते. यामध्ये
1. पिण्याच्या पाण्याची सोय- टँकर आणि विहिरी अधिग्रहण
2. जनावरांसाठी चारा- ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू होणार
3. रोजगार- मनरेगा (MGNREGA) अंतर्गत रोजगाराची कामे वाढवली जाणार
4. आर्थिक मदत- नुकसान भरपाई आणि तातडीची मदत देण्याचा मार्ग मोकळा

Trigger-2 कधी लागणार?
ट्रिगर-1 हा फक्त ट्रेलर आहे. यानंतर सरकार उपग्रहाद्वारे (Satellite Index) जमिनीतील ओलावा, भूजल पातळी तपासणार आहे. हा अहवाल आल्यानंतर ट्रिगर-2 लागू होईल.त्यानंतर गावोगावी प्रत्यक्ष पंचनामे करून जिथे 33% पेक्षा जास्त नुकसान असलेले गाव अधिकृतपणे ‘दुष्काळी’ म्हणून जाहीर होईल आणि सर्व शासकीय सवलती लागू होतील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number