धक्कादायक! अन्नातून 100 जणांना विषबाधा; ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू

मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडे बाजारात एका दुकानदाराकडून भेळ भत्ता खाल्ल्याने 100 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक! अन्नातून 100 जणांना विषबाधा; ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू
food poisoning

मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडे बाजारात एका दुकानदाराकडून भेळ भत्ता खाल्ल्याने 100 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सर्व बाधितांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या नियंत्रणात आहे. नांदगाव बुद्रुक गावात नुकताच आठवडे बाजार भरला होता. या बाजारात खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्रामस्थांनी एका स्थानिक दुकानदाराकडून भेळ भत्ता विकत घेऊन खाल्ला. मात्र, ही भेळ खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना मळमळ, जुलाब आणि उलट्यांचा तीव्र त्रास सुरू झाला. एकाच वेळी अनेक जणांना विशेषतः लहान मुलांना असा त्रास होऊ लागल्याने गावात भीती पसरली. ग्रामस्थांनी सर्व रुग्णांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अचानक रुग्ण वाढल्याची माहिती शहरात पसरताच, मालेगावमधील अनेक खासगी डॉक्टरांनी थेट सरकारी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सरकारी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास मदत केली. वेळेवर मिळालेल्या या वैद्यकीय मदतीमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालय गाठले. त्यांनी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व रुग्णांवर योग्य व तातडीचे उपचार करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या. संबंधित भेळ विक्रेत्याकडील अन्नपदार्थ खराब होते का, याची तपासणी आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) केली जाण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number