कल्याण ते नवी मुंबई काही मिनिटांत! नव्या मेट्रोची तारीख जाहीर, जाणून घ्या स्थानकं

Mumbai Metro 12 Update : एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या अडीच वर्षातच या प्रकल्पाचे तब्बल 53.87 टक्के काम हे पूर्ण केले गेले आहे. आता मे पर्यंत ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कल्याण ते नवी मुंबई काही मिनिटांत! नव्या मेट्रोची तारीख जाहीर, जाणून घ्या स्थानकं
कल्याणहून नवी मुंबईला मेट्रोने झटपट प्रवास

मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दररोजच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मेट्रो 12 या मार्गिकेचे काम हे विक्रमी वेगाने पूर्ण केले जात आहे. मेट्रो 12 म्हणजे कल्याण-डोंबिवली आणि तळोजा.

प्रवास वेळ होणार कमी?
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या अडीच वर्षातच या प्रकल्पाचे तब्बल 53.87 टक्के काम हे पूर्ण केले गेले आहे. आता मे 2028 पर्यंत ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पाहिलं तर कल्याण, डोंबिवलीहून नवी मुंबईला जायचे असेल तर रस्त्यावर तब्बल 2 ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ही मेट्रो 12 सुरु झाल्यानंतर हा त्रास कायमचा संपणार आहे.

हेही वाचा-‘7500’ हायजॅक कोड अन् वैमानिकांमधील वाद… दुबई-तेल अवीव विमानात अपहरणाचा संशय; इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

कल्याण ते तळोजा हे 23.576 किमीचे अंतर फक्त आणि फक्त 45 मिनिटांतच पार करता येणार आहे. यामुळे नोकरदार, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. या प्रकल्पाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारशेडचा प्रश्न हा आधीच सोडवला गेला आहे. सहजा मेट्रो प्रकल्प हे कारशेडच्या जागेमुळे वर्षानुवर्ष रखडले जातात. पण एमएमआरडीएने काम सुरु करण्यापूर्वीच निळजे-निळजेपाडा येथे तब्बल 45 हेक्टर जागा ही ताब्यात घेतली होती.

अशी असतील स्टेशन
हा नवा मार्ग पूर्णपणे एलेव्हेटेड असून तो ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो 5 चाच विस्तार आहे. याच मार्गावर तब्बल 19 स्थानके असणार आहेत. ज्यामध्ये कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, बाकळण, तुर्भे, पिसारवे डेपो, पिसारवे आणि तळोजा. या मेट्रोचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कनेक्टिव्हीटी.

हेही वाचा-काकीच्या प्रेमात वेडापिसा! गरोदरपणात केलं अमानुष कृत्य; एवढ्यावरच थांबला नाही, चित्रपट पाहून पुतण्याने….

ही मार्गिका तळोजा थेट नवी मुंबई मेट्रोला जोडली जाणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई हे तिन्ही महत्त्वाची शहर एकाच मेट्रो जाळ्याने जोडले जातील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number