वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेचा लाभ कोणाला? दुष्काळग्रस्त भागातून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट

दुष्काळग्रस्त कुटुंबीयांसाठी 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेचा लाभ कोणाला? दुष्काळग्रस्त भागातून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट

दुष्काळग्रस्त कुटुंबीयांसाठी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांपर्यंत ही सुविधा काटेकोरपणे पोहोचवण्यासाठी कडक निर्देश जारी केले आहेत.

राज्यातील दुष्काळाचा फटका बसलेल्या 265 तालुक्यांमधून स्थलांतर करणाऱ्या मजूर आणि नागरिकांना आता मोफत धान्य मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही सोयीच्या रेशन दुकानातून बायोमेट्रिकद्वारे मोफत धान्य घेता येणार आहे.

हेही वाचा – पालघरमधील प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा! 3 महिन्यांत हातात मिळणार सातबारा; मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्याला दिले महत्त्वाचे आदेश

दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन घटल्याने आणि चारा टंचाईमुळे पशुधनातूनही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रोजगाराअभावी स्थलांतर करणे भाग पडत आहे. त्यामुळे शासनाने ‘वन नेशन, वन रेशन’ योजना अधिक कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे स्थलांतरित कुटुंबांना मूळ गावच्या रेशन दुकानावर अवलंबून राहावे लागणार नाही. ते जिथे वास्तव्यास असतील, तिथल्याच जवळच्या रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य मिळवू शकणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number