Shehbaz Sharif UNGA: ‘हाफिज सईदवर कारवाई कधी?’; भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मौन बाळगून पळाले

केवळ मुख्यालयात प्रवेश करतानाच नव्हे, तर तेथून बाहेर पडतानाही पत्रकाराने पुन्हा एकदा शाहबाज शरीफ यांना गाठले. 'तुम्ही हाफिज सईदवर कायदेशीर खटला कधी चालवणार?' असा पुनरुच्चार पत्रकाराने केला.

Shehbaz Sharif UNGA: ‘हाफिज सईदवर कारवाई कधी?’; भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मौन बाळगून पळाले
Shehbaz Sharif

Shehbaz Sharif Flees Indian Journalist Question about Hafiz Saeed: संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) 81 व्या अधिवेशनासाठी न्यू यॉर्क येथे पोहोचलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करताना एका भारतीय पत्रकाराने त्यांना थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत प्रश्न विचारून धारेवर धरले. ‘दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणे पाकिस्तान कधी थांबवणार?’ आणि ‘कुख्यात दहशतवादी हाफिज सईदवर कडक कारवाई कधी होणार?’ असे थेट सवाल पत्रकाराने केले. मात्र, या प्रश्नांचे कोणतेही उत्तर न देता पंतप्रधान शरीफ यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तेथून घाईघाईने निघून जाणे पसंत केले.

मुख्यालयातून बाहेर पडतानाही पुन्हा विचारला प्रश्न; व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल
केवळ मुख्यालयात प्रवेश करतानाच नव्हे, तर तेथून बाहेर पडतानाही पत्रकाराने पुन्हा एकदा शाहबाज शरीफ यांना गाठले. ‘तुम्ही हाफिज सईदवर कायदेशीर खटला कधी चालवणार?’ असा पुनरुच्चार पत्रकाराने केला. परंतु, या वेळीही पाकिस्तानी पंतप्रधानांनी मौन बाळगणेच योग्य मानले आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता ते वाहनाच्या दिशेने निघून गेले. या संपूर्ण प्रसंगाचे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद झाले असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे आणि पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर जगभरातून टीका होत आहे.

 

हेही वाचा – Russia Ukraine war: ‘तुमच्या नागरिकांचा फसवून वापर केला जातोय’; झेलेन्स्की यांचे भारतासह 47 देशांना ‘हे’ आवाहन, रशियावर केले गंभीर आरोप

मुंबई आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद
हाफिज सईद हा भारतविरोधी कारवाया करणाऱ्या ‘लष्कर-ए-तैयबा’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मुख्य सूत्रधार आहे. 2008 च्या भयानक मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य कट रचण्यामध्ये त्याचा थेट सहभाग होता. याशिवाय, 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागेही पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याचे तपासात समोर आले असून या मोठ्या कारस्थानात हाफिज सईदचाच सहभाग असल्याचा गंभीर आरोप भारताने केला आहे.

 

जागतिक मंचावर भारताकडून पाकिस्तानची कोंडी; दहशतवादाचा खरा चेहरा उघडा
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेची पोलखोल अनेकदा केली आहे. शेजारील देशांमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाक सरकार व लष्कर दहशतवाद्यांना कसे पाठबळ देते, हे भारताने जगजाहीर केले आहे. न्यू यॉर्कमधील या घटनेमुळे जागतिक व्यासपीठावर पुन्हा एकदा पाकिस्तानची नाचक्की झाली असून, दहशतवादावर उत्तर देण्यास पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख कसे टाळाटाळ करतात, हे संपूर्ण जगासमोर उघडे पडले आहे.

हेही वाचा – Crime News: संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय नागरिकाला निर्घृणपणे संपवलं; शारजात पार्क केलेल्या कारमध्ये आढळले मृतदेहाचे 9 तुकडे

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number