जुगल पाटील, प्रतिनिधी
जळगांव : जळगावमध्ये पावसाने ओढ दिल्याने आता भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता भाजीपाल्याच्या वाढत्या दरांचा फटका बसत आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर गगनाला भिडले असून कांदा 6० रुपये, तर टोमॅटो 30 रुपये किलो भेंडी 60 वरून 80रुपये किलो गोला आहे. तर गवार 120 किलो दराने विकला जात आहे. याशिवाय दोडका, भोपळा, मेथी, अळू यांसह विविध भाज्यांचे दरही वाढले आहेत. पावसाअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.