Monday, June 23, 2025 12:51:58 PM

एलोन मस्कच्या Starlink ला भारतात मंजूरी; आता देशभरात थेट उपग्रहावरून इंटरनेट उपलब्ध होणार

एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारत सरकारकडून सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यामुळे देशातील दुर्गम गावे आणि डोंगराळ भागात जलद इंटरनेट सेवा मिळेल.

एलोन मस्कच्या starlink ला भारतात मंजूरी आता देशभरात थेट उपग्रहावरून इंटरनेट उपलब्ध होणार
Starlink approved in India
Edited Image

नवी दिल्ली: एलोन मस्कच्या स्टारलिंकबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भारतात आता मोबाईल टॉवरशिवायही इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारत सरकारकडून सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यामुळे देशातील दुर्गम गावे आणि डोंगराळ भागात जलद इंटरनेट सेवा मिळेल. स्टारलिंकला भारताच्या दूरसंचार विभागाकडून (DoT) हा परवाना मिळाला आहे. स्टारलिंक आता हा विशेष परवाना मिळवणारी भारतातील तिसरी कंपनी बनली आहे. यापूर्वी वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्सना ही मान्यता मिळाली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टारलिंकला चाचणी स्पेक्ट्रमसाठी अर्ज केल्यानंतर 15 ते 20 दिवसांत चाचणी स्पेक्ट्रम दिला जाईल. याचा अर्थ स्टारलिंक लवकरच भारतात आपली सेवा सुरू करू शकेल.  स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटच्या मदतीने अतिशय दुर्गम भागात इंटनेट सेवा पोहोचवता येणार आहे. त्यामुळे आता कोणतेही गाव किंवा डोंगराळ भाग इंटरनेट सेवेपासून वंचित राहणार नाही. 

हेही वाचा - जपानची चंद्र मोहीम अयशस्वी! लँडिंग दरम्यान मून लँडर रेझिलियन्स क्रॅश

दरम्यान, स्टारलिंक 2022 पासून भारतात इंटरनेट पुरवण्यासाठी परवाना मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहे. आता सरकारने त्याला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे स्टारलिंकला मोठा फायदा मिळणार आहे. या वर्षी मार्चमध्ये भारताची कंपनी एअरटेलने अमेरिकन कंपनी स्पेसएक्स सोबत करार केला होता. आता मंजुरी मिळाल्यानंतर, एअरटेल आणि स्टारलिंक एकत्रितपणे भारतात इंटरनेट पुरवण्यास सुरुवात करू शकतात.

हेही वाचा - व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामला टक्कर देण्यासाठी एलोन मस्क यांनी लाँच केले XChat; काय आहेत खास?

रिलायन्स जिओची स्टारलिंकसोबत भागीदारी - 

तथापि, एअरटेलनंतर भारतातील आणखी एक मोठी कंपनी, रिलायन्स जिओने देखील स्टारलिंकसोबत भागीदारी केली आहे. जिओ देखील स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतात आणण्याची तयारी करत आहे. आता सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर, ही सेवा लवकरच देशाच्या अनेक भागात सुरू केली जाऊ शकते. 
 


सम्बन्धित सामग्री