दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. असंख्य जण या शुभ मुहूर्तावर नव्या वाहनाची खरेदी करत असतात. शोरुममध्येही दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या ऑफर्स असतात. यंदाच्या दसऱ्याला तुम्हीही नवे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर घाईघाईने बुकिंग करण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टी आधीच तपासून घ्या. त्यामुळे नंतर होणारा पश्चात्ताप टाळता येईल.
1. बजेट आणि ऑन-रोड किंमत तपासा
वाहनाची शोरुममध्ये जी किंमत सांगितली जाते ती म्हणजे एक्स-शोरुम असते. त्यावर आरटीओ, इन्शुरन्स, टीसीएस तसेच वाहनाच्या अॅक्सेसरीजचेही पैसे वेगळे लागतात. त्यामुळे ऑन-रोड किंमत नक्की किती येते हे वाहन खरेदीच्या आधीच स्पष्ट करुन घ्या.
2. वेटिंग पिरियडला बळी पडू नका
मह्त्त्वाचे म्हणजे,दसऱ्याला गाडी मिळेल असं सांगूत कित्येकदा बुकिंग घेतलं जात. मात्र, प्रत्यक्ष डिलिव्हरी ही दिवाळीनंतर होते. त्यामुळेच वेटिंग पिरियड लेखी स्वरुपातच घ्या. तुम्हाला दसऱ्या दिवशीच गाडीची डिलिव्हरी हवी असेल तर ते आधीच कन्फर्म करा.
3. डिस्काउंटच्या आमिषाला बळी पडू नका.
शोरुम कंपन्या दसऱ्यात 50 हजारांपर्यंत सूट असल्याचं सांगत असतात. मात्र त्यात बऱ्याचदा जुन्या स्टॉकवरील गाड्यांचा समावेश असतो. तुम्हीही दसऱ्याला वाहन खरेदी पूर्वी गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग वर्ष आणि VIN नंबर नक्की तपासा.
4. इन्शुरन्स आणि फायनान्स
वाहन खरेदी करायला गेल्यानंतर ग्राहकांना शोरुममधून इन्शुरन्स आणि लोन घेण्याची सक्ती केली जाते, असे दिसून आले आहे. मात्र, तुम्हाला बाहेर यापेक्षा स्वस्त पर्याय मिळतो का, याची नक्की तुलना करा. व्याजदर तसेच प्रोसेसिंग फी ही आधीच तपासा.
5. फीचर्स आणि टेस्ट ड्राइव्ह
वाहन खरेदी करण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त फोटो पाहून गाडी कधीच बूक करु नका. तुम्हाला आवडलेल्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन इंजिन, मायलेज तसेच फीचर्स स्वत: नक्की अनुभवा.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update