भारतात सध्या एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे – लोक मोठ्या प्रमाणात जुन्या iPhone खरेदी करत आहेत. नवीन 5G स्मार्टफोनच्या वाढत्या खरेदीमुळे बाजारात जुने स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत, आणि त्यामुळे त्यांची मागणीही वाढली आहे.
गेल्या काही वर्षांत भारतात 5G नेटवर्कचा झपाट्याने विस्तार झाला आहे. वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी लोक नवीन 5G स्मार्टफोन घेत आहेत. मात्र, 5G फोन महाग असल्याने अनेक लोक चांगल्या स्थितीतील जुन्या iPhone खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
जुन्या iPhone ची वाढती मागणी
iPhone हे एक प्रीमियम ब्रँड आहे, आणि नवीन मॉडेल्स खूप महाग असतात. त्यामुळे लोक रिफर्बिश्ड (दुरुस्त केलेले) iPhone खरेदी करत आहेत. यामुळे जुन्या iPhone च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, रिफर्बिश्ड iPhone च्या विक्री किंमतीही चांगल्या राहतात, कारण लोकांना परवडणाऱ्या किमतीत चांगला फोन मिळतो. IDC च्या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये सुमारे 2 कोटी वापरलेले स्मार्टफोन खरेदी करण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत ही विक्री 9.6% ने वाढली आहे. तसेच नवीन स्मार्टफोनच्या विक्रीत केवळ 5.5% वाढ झाली आहे.
हेही वाचा 👉🏻 कोरियन ग्लास स्किन कशी मिळवावी?
भारत जागतिक बाजारात आघाडीवर
जुन्या स्मार्टफोनच्या विक्रीत भारत हा चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषतः iPhone हा सर्वात जास्त विक्री होणारा रिफर्बिश्ड स्मार्टफोन बनला आहे.10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G फोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक ग्राहक परवडणाऱ्या जुन्या iPhone कडे वळत आहेत.
हेही वाचा 👉🏻 सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहात तर सावधान...
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.