UIDAI चा मोठा निर्णय! आधार नाव दुरुस्तीसाठी नवी प्रक्रिया लागू; जाणून घ्या सविस्तर

UIDAI Rules 2026 : आधार कार्डमध्ये नावाचा स्पेलिंग चुकली असेल, लग्नानंतर आडनाव बदलायचे असल्यास किंवा तुमच्या नावात मोठा बदल करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

UIDAI चा मोठा निर्णय! आधार नाव दुरुस्तीसाठी नवी प्रक्रिया लागू; जाणून घ्या सविस्तर
Aadhaar Name Correction Rules Changed

आधार कार्डवरील नाव बदलण्याचे नियम आता बदलले आहे, आता काय करावे लागणार,आधार कार्डमध्ये नावाचा स्पेलिंग चुकली असेल, लग्नानंतर आडनाव बदलायचे असल्यास किंवा तुमच्या नावात मोठा बदल करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

जाणून घ्या सविस्तर
खरं तर UIDAIने आधारमधील नाव दुरुस्तीसाठी आता नवे नियम लागू केले आहेत. 18 सप्टेंबर 2026 पासून हे स्टँडर्ज ऑरकेटिंग प्रोसीजर लागू झालेली आहे. नव्या नियमानुसार नावात नेमका कोणत्या प्रकारचा बदल करायचा आहे, त्यावर आता कोणती कागदपत्रे लागतील हे ठरणार आहे.

हेही वाचा-एव्हरेस्ट जिरे पूडवर FSSAI ची कडक कारवाई, तात्काळ बाजारातून हटवण्याचे दिले आदेश; ‘ही’ धक्कादायक बाब आली समोर

किरकोळ बदलांसाठी काय नियम?
जर तुम्हाला नावात छोटा बदल करायची असले तर त्याला ‘Minor Name Change’ असे म्हणण्यात येते. ज्यात तुमची मूळ असलेली ओळख बदलत नाही. उदारणार्थ, नावाचा पूर्ण विस्तार करणे, मधले किंवा आडनाव जोडणे-काढणे किंवा नावातील शब्दांचा क्रम बदलणे, स्पेलिंगमध्ये असलेली छोटी चूक दुरुस्त करणे, नावातील डॉट काढणे यांचा समावेश होतो. उदारणार्थ ‘Rama Prasad’ चे ‘Rama Shyam Prasad’ करायचे असल्यास हा मोठा बदल मानला जात नाही. त्यासाठी एफिडेविट आणि ओळखपत्र असणे पुरेसे आहे.

लग्नानंतर आडनाव बदलयाचे असल्यास?
लग्नानंतर महिलांना आडनाव बदलायचे असेल तर ‘Annexure D’ नमुन्यातील एफिडेविट आणि ‘Proof of Identity ‘ द्यावा लागणार आहे. या एफिडेविटमध्ये बदल हा फक्त लग्नामुळे होत असल्याचे आणि मूळ ओळख बदलत नसल्याने स्पष्ट लिहावे लागेत. घटस्फोटानंतरही नाव बदलण्यासाठीही हिच प्रक्रिया आहे.

हेही वाचा-Petrol Price Hike : वाहनचालकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी महागलं; पाहा मुंबई, पुणेसह दिल्लीतील नवे दर

ऑपरेटरच्या चुकीमुळे नाव चुकले तर?
बऱ्याचदा नागरिकांनी बरोबर कागदपत्रेही दिलेली असतात. मात्र, आधार केंद्रावरील डेटा एंट्रीमुळे नाव चुकले जाते. अशा वेळी प्रौढ व्यक्तीसाठी ‘Annexure B’ एफिडेविट आणि ओळखीचा पुरावा किंवा नात्याचा पुरावा लागतो. जर इंग्रतीमध्ये नाव बरोबर असेल पण दुसऱ्या भाषेतील नाव चुकल्यास, ते एफिडेविट देऊनही दुरुस्ती करता येते.नावात मोठा आणि पूर्ण बदल करायचा असेल तर मात्र राजपत्र’Gazette Notification’ बंधनकारक असणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number