Sunday, June 01, 2025 05:41:05 AM

UPI Down: व्यवहार ठप्प! लाखो ग्राहकांना पेमेंट समस्या, NPCI ने काय सांगितलं?

देशभरातील यूपीआय सिस्टम अचानक डाऊन झालं. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. या संदर्भात NPCI ने ट्विट करत अपडेट दिले आहेत.

upi down व्यवहार ठप्प लाखो ग्राहकांना पेमेंट समस्या npci ने काय सांगितलं
UPI Down: व्यवहार ठप्प! लाखो ग्राहकांना पेमेंट समस्या, NPCI ने काय सांगितलं?

देशभरातील डिजिटल व्यवहारांचे महत्त्वपूर्ण माध्यम असलेली यूपीआय (UPI) प्रणाली म्हणजे सिस्टम बुधवारी अचानक डाऊन झाली. ज्यामुळं लाखो लोकांना मोठा फटका बसला. ग्राहकांकडून पेमेंट फेल होण्याच्या तक्रारी वाढल्या. तर काहींच्या खात्यातून दोन वेळा पैसे कट होण्याच्या घटनाही घडल्या. यूपीआय सिस्टम बंद पडल्याने फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) सारखी लोकप्रिय पेमेंट अॅप्सही ठप्प झाल्या आहेत.

यूपीआय सेवा डाऊन असल्याने अनेक युजर्सनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत ही माहिती शेअर केली. अनेकांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत यूपीआय डाउन आहे का? असं प्रश्न विचारले. याला हजारो लोकांनी त्याला प्रत्युत्तरात होय असे सांगितलं. डाऊनडिटेक्टरच्या (DownDetector) अहवालानुसार, सायंकाळी सात वाजल्यानंतर १ हजार ३०० हून अधिक लोकांनी यूपीआय सेवा बंद पडल्याची तक्रार केली आहे.

यूपीआय सिस्टमचे नियंत्रण करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या समस्ये संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून यात त्यांनी NPCI ला तांत्रिक अडचणी आल्या होत्या. ज्यामुळं यूपीआय सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. पण आता समस्या सोडवण्यात आली असून संपूर्ण प्रणाली पुन्हा स्थिर झाली आहे. आम्ही असुविधेसाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं आहे. 

हेही वाचा - शाहरुख खानचा लाल पासपोर्ट विशेष का? भारतीय पासपोर्टचे प्रकार, वैशिष्टे जाणून घ्या!


व्यवहार ठप्प, व्यापाऱ्यांना फटका
विशेष म्हणजे, NPCI ची उपकंपनी NPCI BHIM सर्व्हिसेस लिमिटेड (NBSL) ने मंगळवारीच BHIM 3.0 या यूपीआय अॅपचे नवीन अपडेट लाँच केले होते. परंतु, त्याच्या दुसऱ्याच दिवशी यूपीआय डाऊन झाल्याने याची चर्चा रंगली आहे. यूपीआय व्यवहार बंद पडल्याने अनेक व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले. किराणा दुकानदार, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप आणि विविध सेवा पुरवणारे व्यवसाय डिजिटल पेमेंटवर अवलंबून असल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना देखील व्यवहार पूर्ण करता आले नाहीत.

हेही वाचा - ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवस वैध असतं? काय आहे नियम

पैसे कट झाले? तर काय करावं 
जर यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झाले असेल किंवा पैसे खात्यातून गेले पण समोरच्या व्यक्तीला पोहोचले नाहीत. तर घाबरून जाण्याची गरज नाही. एनपीसीआयच्या नियमांनुसार, अशा परिस्थितीत पैसे आपोआप २४ ते ४८ तासांत परत येतात. पण काही लोकांना थेट त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा लागू शकतो. 
 


सम्बन्धित सामग्री