What’s App आता शुल्क लागू करणार? Meta व्हॉट्सॲप बिझनेसचा ‘हा’ बदल जाणून घ्या

मेटा व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या व्यवसायांसाठी मोठी बातमी आहे.

What’s App आता शुल्क लागू करणार? Meta व्हॉट्सॲप बिझनेसचा ‘हा’ बदल जाणून घ्या
WhatsApp Update

मेटा व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या व्यवसायांसाठी मोठी बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून मोफत सर्व्हिस मेसेजेसची सुविधा बंद होणार आहे. मेटाच्या म्हणण्यानुसार, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ज्या सोल्युशन प्रोव्हायडर किंवा थेट-एकीकृत व्यवसायांनी पेमेंट पद्धत नोंदवलेली नाही, त्यांना 1 October पासून सर्व्हिस मेसेजेस पाठवता येणार नाहीत.

काय बदल होत आहे?
सध्या मेटा व्यवसायांना मार्केटिंग, युटिलिटी आणि ऑथेंटिकेशन टेम्पलेट मेसेजेससाठी शुल्क आकारले जाते. 1 नोव्हेंबर 2024 पासून नॉन-टेम्पलेट सर्व्हिस मेसेजेस मोफत होते आणि 1 जुलै 2025 पासून 24-तासांच्या ग्राहक सेवा विंडोमध्ये पाठवलेले युटिलिटी मेसेजेस मोफत होते. मात्र आता 1 October 2026 पासून या दोन्ही प्रकारच्या मेसेजेससाठी पैसे मोजावे लागतील.

सर्व्हिस मेसेज म्हणजे काय?
सेवा संदेश हे मानवी ग्राहक सेवा प्रतिनिधी किंवा थर्ड-पार्टी AI द्वारे पाठवलेले नॉन-टेम्पलेट प्रतिसाद असतात. ते फक्त 24-तासांची विंडो उघडी असतानाच पाठवता येतात. याचा वापर करून व्यवसाय ग्राहकांशी नवीन संभाषण सुरू करू शकत नाहीत.

भारतात किती खर्च येईल?
मेटाच्या नव्या दरानुसार:
– दरमहा पहिले 1,000 सर्व्हिस मेसेजेस FREE असतील (प्रत्येक बिझनेस नंबरसाठी).
– त्यानंतर प्रत्येक मेसेजसाठी 0.115 Rs + 18% GST = 0.136 Rs लागेल.

उदाहरण: जर तुम्ही महिन्यात 1,500 रिप्लाय पाठवले तर 500 मेसेजेससाठी 57.50 Rs + GST असे 67.85 Rs भरावे लागतील.

इतर दर (GST शिवाय):
– Utility Message: 0.115 Rs
– Marketing Message: 0.8631 Rs
– Authentication / OTP: 0.115 Rs

व्यवसायिकांनी काय करावे लागेल?
व्हाट्सअ‍ॅप बिझनेस एपीआय वापरणाऱ्या व्यवसायांना 30 सप्टेंबर 2026 च्या आत Meta Business Manager मध्ये Credit Card, Debit Card किंवा Credit Line add करणे बंधनकारक आहे. हा बदल फक्त एपीआय वापरणाऱ्या मोठ्या व्यवसायांसाठी आहे. सामान्य व्हाट्सअ‍ॅप किंवा व्हाट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप वापरणाऱ्या छोट्या दुकानदारांवर याचा परिणाम होणार नाही

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number