महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.
यंदा पावसाळ्यावर एल-निनोचा तीव्र प्रभाव असल्यामुळे पावसाने अर्ध्यातच दांडी मारली. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होताच महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल जाणवू लागला आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असून परतीचा प्रवास सुरू आहे. मात्र, राज्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत सध्या पावसाच्या सरी सुरू असून, काही ठिकाणी मात्र उन्हाचा तडाखा कायम आहे.